राहुल गांधींच्या सांगण्यावरुन ‘UPSC’ सोडून ‘राजकारणात’ ठेवलं ‘पाऊल’, 28 व्या वर्षी बनली ‘आमदार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हजारीबागच्या बडकागाव विधानसभा मतदार संघाच्या काँग्रेसच्या 28 वर्षीय महिला उमेदवार अंबा प्रसाद यांनी निवडणूकीत विजय मिळवून इतिहास रचला गेला. अंबा प्रसाद झारखंड विधानसभा निवडणूकीत एकमात्र अशा उमेदवार होत्या ज्या अविवाहित होत्या. अंबा प्रसाद यांनी झारखंड निवडणूक 2019 मध्ये सर्वात कमी वयाच्या आमदार बनण्याचा इतिहास रचला. अंबा प्रसाद आजसू यांनी रोशन चौधरी यांच्या 30,140 मते मिळवत विजय मिळवला.

यूपीएससीचा अभ्यास सोडून आमदार झाल्या –
बडकागाव विधानसभेतून याआधी अंबा प्रसाद यांची आई आणि वडील यांनी निवडणूक जिंकली होती. परंतु कफन सत्याग्रहदरम्यान आई वडीलांना तुरुंगात जावे लागले. त्यानंतर अंबा यूपीएससीचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीला गेल्या होत्या, त्या पुन्हा गावी परतल्या. घरी येऊन त्यांनी हजारीबाग न्यायालयात वकीली सुरु केली आणि आई वडील तसेच भावांवर असलेल्या खटल्यावर स्वत: लक्ष घातले.

याच कफन सत्याग्रह प्रकरणानंतर अंबा यांचे वडील तुरुंगात आहे तर आई तडीपार आहे. अंबा प्रसाद यांनी मोठ्या संघर्षानंतर भावांना तुरूंगातून सोडवले, परंतु वडील अजूनही तुरुंगात आहेत. अंबा यांनी विधानसभा निवडणूकीत विजय मिळत आपल्या कुटूंबाचा मतदार संघ राखला. अंबा यांनी सांगितले की मी कधी विचार देखील केला नव्हता की मी आमदार बनेल. परंतु आता आई वडीलांच्या तुरुंगात जाण्यानंतर शपथ घेतली की बडकागाव विधानसभा क्षेत्राच्या विकासाचे आई वडीलांचे स्वप्न पूर्ण करणार.

आई वडील, भावांवर दाखल होते खटले –
अंबा यांनी सांगितले की, माझे संपूर्ण कुटूंब कफन सत्याग्रहामध्ये अडकले. मी 2014 साली बीआयटीमधून बीबीए केले होते. मी विनोबा भावे विश्वविद्यालयातून वकीलीचे शिक्षण घेतले आहे. माझ्या वडिलांवर राजकीय आरोप आहेत आणि त्यांना निवडणूकीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला गेला. कुटूंबावर हे संकट असल्याने मी दिल्लीत आयएएस परिक्षेची तयारी देखील योग्य प्रकारे करु शकत नव्हते. मी पुन्हा हजारीबागला आले आणि येथे वकीलीस सुरुवात केली. बडकागावमध्ये जल जंगल जमीनीची लढाई लढली जात आहे.

त्या म्हणाल्या की वडीलांच्या सुटकेसाठी मी दिल्लीत राहुल गांधींना भेटले. मी राहुल गांधींना आग्रह केला की मला चांगले वकील द्या. या दरम्यान कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी आणि सलमान खुर्शीद यांना देखील भेटले. अहमद पटेल यांनी मला या कामासाठी मदत केली. राहुल गांधींना माझ्या वडीलांबाबत संपूर्ण माहिती मिळाली तेव्हा त्यांनी दिल्लीत कायदेशीर मदत मिळवून दिली. तसेच सांगितले की काँग्रेससाठी काम कर. त्यानंतर मला काँग्रेसच्या नेत्यांचे देखील समर्थन मिळाले. लोकसभेसाठी माझ्या उमेदवारीवर विचार करण्यात आला परंतु अंतिम यादीत मला स्थान मिळाले नाही, परंतु विधानसभेत मला उमेदवारी मिळाली.

झारखंडमधील सर्वात कमी वयाची मंत्री बनू शकतात –
अंबा प्रसाद यांनी सांगितले की त्यांनी मंत्री बनण्याची संधी मिळाली तर त्या चांगले काम करेल. त्या म्हणाल्या की मागील चार वर्षांपासून या मतदारसंघासाठी काम करत आहे. मला लोक योगेंद्र साव आणि निर्मला देवींची मुलगी म्हणून ओळखतात. दरम्यान अंबा यांच्याबाबत चर्चा आहे की त्या हेमंत सोरेन यांच्या सरकारमध्ये राज्य शिक्षण मंत्री म्हणून काम पाहू शकतात.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/