बॉम्बशोधक पथकातील ‘रँचो’ श्वानाचे निधन

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर पोलीस दलाच्या बॉम्बशोधक आणि नाशक पथकातील महत्वाचा हिरा असलेल्या ‘रँचो’ या श्वानाचे  बुधवारी निधन झाले.  कोल्हापूरची करवीरनिवासिनी अंबाबाई, जोतिबा मंदिर, विमानतळ आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे आणि मतदान यंत्रांच्या स्ट्राँग रूम अशी एक ना अनेकांची सुरक्षा, अशा एक ना अनेक जबाबदाऱ्या असणाऱ्या कोल्हापूर पोलीस दलाच्या बॉम्बशोधक पथकातील महत्त्वाचा हिरा असणारा ‘रॅँचो’ या श्वानाचे बुधवारी उपचारादरम्यान शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये निधन झाले. तो १५ दिवसांपासून मधुमेहाच्या आजाराने त्रस्त होता. अभिनेता अमिर खानने ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटात ‘रॅँचो’ या हुशार विद्यार्थ्याची भूमिका रंगविली होती.

ती व्यक्तिरेखा चित्रपट रसिकांना खूप भावली. त्याप्रमाणे बॉम्बशोधक पथकातही असा हुशार, लॅब्रेडॉर जातीचा रॅँचो नावाचा श्वान होता. दुपारी साडेचारच्या सुमारास पोलीस मुख्यालयातील मोकळ्या जागेत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like