सपना चौधरी नंतर ‘या’ अ‍ॅक्टरची भाजप मध्ये एन्ट्री ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हरियाणामध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या वेळी राज्यामध्ये प्रत्येक अ‍ॅक्टिव्हिटीला राजकीय दृष्टीने बघितले जात आहे . बॉलीवूड अ‍ॅक्ट्रेस-डान्सर सपना चौधरीने राजकीय क्षेत्रात पाऊल टाकल्यानंतर आता अ‍ॅक्टर रणदीप हुड्डा राजकरणात येण्याची चर्चा चालू आहे. या चर्चांचे कारण देखील आहे. या दिवसांमध्ये रणदीप हुड्डा हरियाणा मध्ये खूप व्यस्त आहे. त्याने राज्यचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची भेट देखील घेतली आहे. असे सांगितले जात आहे की, सपना चौधरी नंतर हा अ‍ॅक्टर पण भारतीय जनता पार्टी मध्ये सामील होऊ शकतो.

image.png

रणदीप हुड्डाने सीएम मनोहर लाल खट्टरसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. त्याने फक्त फोटोच शेयर केले नाही तर त्यांचा कामाची प्रशंसा देखील केली. फोटोसोबत रणदीपने लिहिले की, “हरियाणा के मुख्यमंत्री माननीय मनोहर लाल खट्टर साब से मुलाकात की और उन्हें बधाइयां दीं उन रिफॉर्म्स के लिए जो वह सभी सेक्टर्स में लेकर आए हैं… जिस स्तर की पारदर्शिता उनकी सरकार में है वो काबिल-ए-नजीर है.”

रणदीपने हे देखील लिहिले की, “जिस भी तरह से मदद की जरूरत है मैंने अपनी होम स्टेट हरियाणा के लिए की है.”

महत्वाची गोष्ट म्हणजे हरियाणा भाजपसाठी एक महत्वपूर्ण राज्य आहे. भाजप राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. जाट बहुल राज्यामध्ये रणदीपची मदत पार्टीसाठी फायदेशीर ठरेल. लोकसभा निवडणुकीत जाट बहुल भागात भाजपला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. रणदीप हुड्डा जाट कम्युनिटी मधील आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like