‘झांसे में फांसो’ मोदींचं सुत्र ; रणदीप सुरजेवाला यांचा मोदींवर हल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – झांसे में फांसो असं मोदींचं सुत्र आहे. १२५ कोटी देशवासी नरेंद्र मोदींच्या १२५ प्रश्नांचं उत्तर मागत आहेत. मोदी सरकारने देशाच्या विश्वासात विष मिसळलं आहे. असं वक्तव्य कॉंग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी काही काव्य पंक्तीही बोलून दाखवल्या.

फिर एक बार उन्होंने किया झांसा पत्र तैयार

देश की जनता खारीज करेगी इसबार

और झोला उठाके रहो जाने को तैयार

मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कामगिरीला किती गुण द्याल असं भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांना विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी मोदींची पाटी कोरीच असल्याचं सांगितलं. आज जाहीरनामा प्रसिद्ध केला तेव्हा नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शहा, अरुण जेटली, सुषमा स्वराज ह्या काही शब्दांची नावं घेतली.

नोकरी, बेरोजगारी, नोटबंदी, जीएसटी, काळं धन या शब्दांचा उच्चारच त्यांनी केला नाही. मैं, मुझे और मेरा च्या नशेत चूर अहंकारी शहेनशहाने एक प्रश्नही पत्रकाराला विचारू दिला नाही.

You might also like