…तेव्हा ‘PM’ मोदीच ‘दिल्ली’ला म्हणत होते ‘रेप कॉपिटल’, काँग्रेस नेत्याकडून भाजपला घेरण्याचा प्रयत्न (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रेप इन इंडिया असे वक्तव्य केले. यानंतर लोकसभेत गोंधळ उडाला. भाजपच्या सर्व महिला खासदारांकडून राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. परंतू यावर काँग्रेसने उलट भाजपलाच घेरल्याचा प्रयत्न केला. काँग्रेस नेता रणदीप सुरजेवाला यांनी शुक्रवारी सकाळी एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला.

ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीला रेप कॉपिटल म्हणत आहेत. रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केले की, पंतप्रधान मोदी देशात पसरलेली अराजकतेवरुन लक्ष भटकवण्यासाठी संसद चालू देत नाहीत. त्यांनी हे जाणून घेतले पाहिजे की देशातील तरुणी, बलात्कार प्रकरणावर निर्णायक कार्यवाही व्हावी अशी इच्छा व्यक्त करत आहेत. रेप इन इंडिया तुम्हाला मान्य नसेल तर तुम्हीच केलेले वक्तव्य तुम्ही ऐका, जर हे योग्य नसेल तर स्वत: माफी मागा.

रणदीप सुरजेवाला म्हणाले की, पंतप्रधान मोदींचा जो जुना व्हिडिओ ट्विट केला आहे, त्यात ते म्हणाले आहेत की, सध्या दिल्लीत बलात्काराच्या अनेक घटना घडत आहे. दिल्ली रेप कॉपिटल बनली आहे. दिल्लीला ज्या प्रकारे रेप कॉपिटल बनवण्यात आले आहे त्यामुळे संपूर्ण जगात भारताची बदनामी होत आहे. तुमच्याकडे आई बहीणीच्या सुरक्षेसाठी ना कोणतीही योजना आहे ना दम आहे आणि ना यासाठी तुम्ही काही करत आहेत.

सध्या झारखंडमध्ये निवडणूकांचा प्रचार सुरु आहे. झारखंडमध्ये पंतप्रधान मोदींच्या मेक इन इंडियावर निशाना साधताना राहुल गांधींनी मेक इन इंडियाची तुलना रेप इन इंडियाशी केली. यामुळे शुक्रवारी संसदेत गोंधळ झाला. स्मृती इराणी यांच्या नेतृत्वात भाजपच्या महिला खासदारांनी राहुल गांधींनी संसदेत माफी मागावी अशी मागणी केली. तसेच त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी देखील मागणी करण्यात आली.

याशिवाय केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला. राहुल गांधी लोकसभेचे सदस्य राहण्याच्या पात्रतेचे नसल्याचे ते म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/