अभिनेते रणधीर कपूर यांना ICU मध्ये हलवले; म्हणाले – ‘मला कोरोना कसा झाला माहित नाही’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या त्यांच्यावर मुंबईतील कोकिळाबेन रूग्णालयात उपचार सुरू आहेत. रणधीर यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. इंडिया टाईम्ससोबत संवाद साधताना खुद्द रणधीर यांनी याची माहिती दिली आहे. ते म्हणाले, मी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. मला कोरोना कसा झाला, माहित नाही. मी स्वत: हैराण आहे. माझ्या 5 स्टाफ मेंबर्सलाही कोरोनाची लागण झाल्याने मी त्यांनाही रूग्णालयात दाखल केले आहे.

मला पुढच्या काही टेस्टसाठी आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. रूग्णालयातील डॉक्टर्स आणि स्टाफ सर्वजण शिवाय टीना अंबानी माझी काळजी घेत आहेत. डॉक्टर्स सतत माझ्या अवतीभवती आहेत. सध्या तरी सर्व काही नियंत्रणात आहे, असल्याचे रणधीर कपूर यांनी सांगितले. मी कोरोना लसीचे दोन्ही डोज घेतले होते. यादरम्यान मला काहीसी कणकण जाणवली, तसेच सोम्य ताप देखील होता. त्यामुळे मी कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यात माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मला रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या ताप नाही, गंभीर लक्षणे नाहीत. ना श्वास घ्यायला त्रास होतो. ना ऑक्सिजन वा आयसीयू सपोर्टची गरज आहे. माझ्या दोन्ही मुली करिना आणि करिश्मा, तसेच पत्नी बबीता यांच्याही कोरोना टेस्ट केली असून त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याचे त्यांनी सांगितले.