होळी 2020 : ‘रंगभरी’ एकादशीपासून काशीमध्ये होळीला झाला ‘प्रारंभ’, भाविकांनी बाबा विश्वनाथांवर ‘गुलाल’ उधळला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण देश आणि जगभरात हिंदू धर्माला मानणारे फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमा तिथीला होळीचे पर्व समजतात. काशीतील होळीच्या पाच दिवसीय महोत्सवाची सुरुवात रंगभारी एकादशीने झाली आहे. बाबा काशी विश्वनाथ आणि माता पार्वती यांना अबीर गुलाल लावून भाविकांनी होळीला प्रारंभ केला.

आशी मान्यता आहे की, बाबा काशी विश्वनाथ होळी खेळत रंगभरी एकादशीच्या दिवशी माता पार्वतीची हिमालयात पाठवणी करून आपला प्रांत काशी येथे पोहचले होते. त्याचेच प्रतीक म्हणून प्रत्येकवर्षी माता पार्वतीच्या पाठ्वणीची मोठी शोभायात्रा काढली जाते.

ही शोभा यात्रा प्राचीन महंत निवासापासून टेढी नीम भागात असणाऱ्या महंतांच्या घरापासून निघते. कारण कशी विश्वनाथ मंदिर कॉरिडोर भागत गेले आहे. पण यामुळे भक्तांच्या उत्साहात आजिबात कमी आलेली नाही.

संगीत आणि डमरूच्या तालावर कलाकार शिव-पार्वती च्या रूपात नाचत होते. अशी मान्यता आहे की, जेव्हा बाबा कशी विश्वनाथ रंगभरी एकादशी दिवशी माता पार्वती काशीला आली होती तेव्हा तेथील लोकांनी त्यांच्यासोबत होळी खेळली होती.

भक्तांचा 356 वर्षांपासून हा विश्वास आहे. भगवान विश्वनाथ आणि माता पार्वती यांची चांदीची मूर्ती महंत निवासस्थानाबाहेर जाऊन काशी विश्वनाथ मंदिर परिसरातून जाते तेव्हा हजारो भाविक त्यांच्यासमवेत अबीर-गुलाल खेळतात.

यावेळीही भाविकांमध्ये असाच उत्साह होता. मात पार्वती आणि भोले बाबा यांच्या पालखीची मिरवणूक टेढी नीम परिसरातून निघाली आणि भाविकांसह अबीर गुलाल खेळत काशी विश्वनाथ मंदिरात पोहोचली.

विश्वनाथ मंदिराचे माजी महंत तिवारी अनेक वर्षांपासून ही परंपरा पाळत आहेत. त्यांनी सांगितले की ज्याप्रमाणे सामान्य विवाहाच्या सर्व विधी आठवड्यांपूर्वी सुरू होतात, त्याच प्रकारे बाबांच्या लग्नाचीही तयारी केली जाते.