सर्वाधिक ‘बलात्कार’ आणि ‘अंडरवर्ल्ड’चा पैसा, कंगनाची बहिण रंगोली म्हणाली – ‘बॉलीवुड म्हणजे गटर’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलीवुडची क्वीन कंगना राणावतची बहीण रंगोली चंदेल ही नेहमी तिच्या बहिणीप्रमाणेच आपले विचार बिनधास्त मांडते. बॉलिवुडवर तिने टीका करणे ही बॉलीवुडसाठी नवी गोष्टी नाही. परंतु, यावेळेस रंगोलीने बॉलीवुडच्या काही स्टार्सना टार्गेट केले आहे आणि या कलाकारांबाबत खुप काही वाईट म्हटले आहे. रंगोलीने थेट जेएनयूच्या विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी उतरलेल्या सेलेब्रिटीजवर निशाणा साधला आहे. रंगोलीने अनेक ट्विट करत आपले म्हणणे मांडले आहे. तिने म्हटले आहे की, हे सत्य आहे की दोन दशकांपूर्वी बॉलीवूड इंडस्ट्री अंडरवर्ल्ड डॉन चालवत होते. ते उघडपणे सर्वांकडून पैसे वसूल करत होते.

महिलांवर त्यांच्यासोबत झोपण्यासाठी दबाव आणला जात होता. आणि जे लोक या माफियांविरूद्ध आवाज उठवत त्यांना उघडपणे शूट केले जात होते. त्या लोकांबद्दल हे काहीही बोलले नाहीत. बॉलीवुडचा हा मुर्खपणा संपूर्ण देशाला माहिती आहे. इंडस्ट्रीत अमिताभ बच्चन, कंगना राणावत आणि आमिर खानसारखे काही चांगले सेलिब्रिटीज आहेत ज्यांचे पूर्ण लक्ष बॉलीवुड इंडस्ट्रीची प्रतिष्ठा जपण्याकडे आहे. रंगोली एवढ्यावरच थांबली नाही. तिने म्हटले, बॉलीवुड एक छोटे गटर आहे. येथे कलेच्या नावावर सर्वात जास्त बलात्कार, हॅरेसमेन्ट, सेक्सिझम, अंडरवर्ल्ड ब्लॅकमनी असून आउटसायडर्स छळतात. या ठिकाणी चित्रपटांच्या नावावर धर्माला नष्ट केले जाते.

हे चिल्लर सांगणार देश कसा चालवायचा, हे मुव्ही माफियांचे तळवे चाटतात, मुव्ही माफियांचे भक्त बनतात, शंभर रूपयांसाठी आपले ईमान विकतात, कुठेही नाचवा यांना, हे आम्हाला शिकवणार देश कसा चालवायचा असतो, असे रंगोलीने म्हटले आहे. जेएनयूच्या विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या कलाकारांवर रंगोलीने आपला राग काढला आहे. जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर अनुराग कश्यप, विशाल भारद्वाज, दीया मिर्जा, तापसी पन्नू सारखे कलाकार सरकारविरोधात निदर्शने करत आहेत. यामध्ये छपाकमधील अभिनेत्री दीपिका पादुकोणसुद्धा सहभागी झाल्यानंतर हा मुद्दा अधिक लक्षवेधक झाला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/