‘सरोगेसी’नं पालक बनलेल्या सेलेब्सवर ‘भडकली’ रंगोली चंदेल, सुष्मिता सेनला केला ‘सलाम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस शिल्पा शेट्टी सरोगेसीनं दुसऱ्यांदा आई झाली आहे. 15 फेब्रुवारी रोजी तिनं एका मुलीला जन्म दिला. 21 फेब्रुवारी रोजी शिल्पानं मुलीच्या हातासोबतचा एक फोटो शेअर केला आणि ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली होती. यानंतर बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कंगना रणौतची बहिण रंगोली चंदेल हिनं ट्विट करत शिल्पावर निशाणा साधला होता. यानंतर आता रंगोलीनं अभनेत्री सुष्मिता सेनचं कौतुक केलं आहे. एकीकडे लोक सरोगेसीनं पालक बनत आहेत परंतु सुष्मितानं मात्र सरोगेसी सोडून मूल दत्तक घेऊन आई होणं पसंत केलं असं तिनं म्हटलं आहे. रंगोलीनं यासंदर्भात ट्विट केलं आहे.

रंगोली चंदेल आपल्या ट्विटमध्ये म्हणते, “मी सुष्मिता सेनला सेल्युट करते. प्रत्येक आई ही एका मुलासाठी आई आहे, ना की अशी आई जी आपले क्रोमोसोम टाईप कॅरी करण्यापर्यंतच मर्यादित आहे. मीडियानं अशा पालकांना प्रोत्साहन द्यायला हवं ज्यांनी क्रोमोसोम टाईप इमोशन्सच्या पलीकडे जाऊन एका नाजूक जीवापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे.” रंगोलीनं अनेक ट्विट केले आहेत आणि सिलेक्टीव पॅरेंटींग आणि बॉलिवूड सेलिब्रेटींच्या सरोगेसी प्रक्रियेला फॉलो करण्याला घेऊन टीका केली आहे.

रंगोलीचं म्हणणं आहे की, आमिर खान आणि इतर कलाकार सरोगेसीऐवजी जे भुकेनं मरत आहेत आणि ज्यांना घराची गरज आहे त्या मुलांना दत्तक का घेत नाहीत. आणखी एका ट्विटमध्ये ती म्हणते, “हे श्रीमंत आणि फेमस लोक आपला खोटा आनंद दाखवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. फेक अफेअर्स, फेक मॅरेज आणि फेक पॅरेंटींग.” या ट्विटमुळे रंगोलीवर खूप टीका होताना दिसली.

कसा सुरू झाला वाद ?

फिल्म क्रिटीक सुभाष झा यांनी ट्वि करत लिहिलं होतं की, “बॉलिवूडमधील सोशल मीडिया डार्लिंग्स आपल्या सरोगेट पॅरेंटहुडला फ्लाँट का करत असतात. देशात खूप सारी मुलं अनाथ आहेत. सेलेब्सनं मुलांना दत्तक घेत चाहत्यांनासाठी मिसाल बनायला हवं.” रंगोलीनं याच ट्विटला उत्तर देत सेलेब्सवर निशाणा साधला होता.

You might also like