शिल्पा शेट्टी दुसर्‍यांदा ‘सरोगेसी’ आई बनल्यावर रंगोली चंदेलनं साधला निशाणा, म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस शिल्पा शेट्टी सरोगेसीनं दुसऱ्यांदा आई झाली आहे. 15 फेब्रुवारी रोजी तिनं एका मुलीला जन्म दिला. 21 फेब्रुवारी रोजी शिल्पानं मुलीच्या हातासोबतचा एक फोटो शेअर केला आणि ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली होती. समीशा शेट्टी असं तिच्या मुलीचं नाव असल्याचंही तिनं सांगितलं आहे. 44 व्या वर्षी आई झालेल्या शिल्पाला सर्वांनीच शुभेच्छा दिल्या आहे. अशातच आता बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कंगना रणौतची बहिण रंगोली चंदेल नेहमीच बॉलिवूड सेलेब्सवर निशाणा साधत असते. यावेळीही तिनं तसंच केलं आहे. रंगोलीनं याबाबत ट्विट केलं आहे.

रंगोली चंदेल आपल्या ट्विटमध्ये म्हणते, “मला एक मुलगा आहे आणि मला दुसरं मूल हवं आहे. मी आणि माझ्या पतीनं मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मला लोकांना यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे की, त्यांनी सरोगेसी ऐवजी मूल दत्तक घ्यायला हवं. जे आधीच या जगात आहेत आणि ज्यांना पालक हवे आहेत त्यांना घर देण्याचा प्रयत्न करूयात.”

https://twitter.com/Rangoli_A/status/1230809731242983425

रंगोलीनं आणखी ट्विट केलं आहे ज्यात तिनं दुसऱ्यांदा आई होणार असल्याचं सांगितलं आहे. रंगोली म्हणते, “माझ्या बहिणीनं मला असं करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे. मी आणि अजयनं सर्व फॉर्मेलिटी केली आहे. आशा करते की, लवकरच आमची मुलगी आमच्यासोबत असेल. कंगनानं तिला गंगा नाव दिलं आहे. मला आनंद आहे की, मी एका मुलीला घर देण्यास सक्षम आहे.

https://twitter.com/Rangoli_A/status/1230810157518479361