Birthday Special : जयललिता यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त ‘थलायवी’मधील कंगनाचा नवा ‘लुक’ समोर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार कंगना रणौत गेल्या अनेक दिवसांपासून आगामी सिनेमा थलायवीमुळे चर्चेत आहे. लवकरच कंगना प्रसिद्ध नेता जयललिता यांच्या बायोपिकमध्ये प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. सध्या कंगना या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त असल्याचं दिसत आहे. 24 फेब्रुवारी 1948 रोजी जयललिता यांचा जन्म तमिळ कुटुंबात झाला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त थलायवीच्या मेकर्सनं थलायवीमधील कंगनाचा लुक सोशलवर शेअर केला आहे.

थलायवीमधील कंगनाचा समोर आलेला लुक खूपच दमदार दिसत आहे. कंगना हुबेहूब जयललिता यांच्यासारखीच दिसत आहे. ज्या रंगाची साडी जयललिता यांनी नेसली आहे त्याच रंगाच्या साडीत कंगना दिसत आहे. कपाळावरील टिकलीही कंगनानं सेम त्यांच्यासारखीच लावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंगनानं आपल्या या लुकसाठी प्रोस्थेटिक्स व्यतिरीक्त 8-10 किलो वजनदेखील वाढवलं आहे. कंगना या सिनेमाला घेऊन खूपच एक्साइ़टेड आहे. विष्णु इंदुरी या सिनेमाची निर्मिती करत आहेत. विजय या सिनेमाचं डायरेक्शन करत आहेत.

थलायवी सिनेमात कंगनाव्यतिरीक्त अरविंद स्वामीदेखील दिसणार आहेत. कंगनाचा थलायवी हा सिनेमा 26 जून रोजी रिलीज होणार आहे. चाहते या सिनेमाची आतुरतेनं वाट पहात आहेत.

 

You might also like