31 वर्षांपासून सुरूय ‘रंगोली’, आतापर्यंत 11 अभिनेत्रींनी केलंय ‘होस्ट’ ! TRP मध्ये केला होता ‘विक्रम’


पोलिसनामा ऑनलाइन –
नॅशनल चॅनेल दूरदर्शनवर आतापर्यंत अनेक शो आले आणि गेले. परंतु एक असा शो आहे जो गेल्या 31 वर्षांपासून सुरू आहे. खास बात अशी की, 3 दशकांहून अधिक काळ जाऊनही हा शो आजही पसंत केला जातो. या शोचं नाव आहे रंगोली. हा एक म्युझिकल शो आहे.

80 आणि 90 काळात म्युझिक चॅनल नव्हते. शिवाय युट्युबही नव्हतं. अशात सदाबहार गाण्यांनी सजलेला शो रंगोली टेलीकास्ट होत असे. अनेक लोक सुमधूर गाण्यांनी आपली सकाळ छान बनवत असते.

रंगोली हा शो 1989 मध्ये लाँच झाला होता. 1990 साली हा शो पाहिला जाऊ लागला. केवळ भारतच नाही तर मिडल ईस्ट आणि अमेरिकेतील लोकही हा शो पहात होते.

2014 साली रंगोली हा शो हाएस्ट रेटेड प्रोग्राम बनला होता. रविवारी सकाळी 8 ते 9 वाजताच्या स्लॉटमध्ये या शोनं विक्रमी काम केलं होतं.

प्रत्येक रविवारी रंगोली हा शो टेलीकास्ट केला जायचा. या शोची खास बात अशी की, अद्याप 11 अॅक्ट्रेसनं हा शो होस्ट केला आहे.

सर्वात आधी हा सो ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी होस्ट केला होता. यानंतर शर्मिला टागोर, मयुरी कांगो, प्राची शाह, श्वेता तिवारी, सारा खान, स्वरा भास्कर, नीतू चंद्रा, सुरवीन चावला, हर्षिता भट, मधू यांनी हा शो होस्ट केला आहे.

एक वेळ अशीही होती की, अभिनेता इंदर कुमार यांनी हा शो होस्ट केला होता. सध्या ऑगस्ट 2019 पासून मात्र अभिनेत्री मधू हा शो होस्ट करत आहे.

सध्या बॉलिवूडमधील सुमधुर गाण्यांनी सजलेला हा शो रोज टेलीकास्ट होत आहे. रोज सकाळी 8 वाजता हा शो पाहिला जात आहे.