रानी चटर्जीचा ‘तो’ DANCE का होत आहे VIRAL ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भोजपुरी सिनेमातील प्रसिद्ध अ‍ॅक्ट्रेस रानी चटर्जीच्या फॅन फॉलोविंगबाबत सगळ्यांना माहीतच आहे. जेव्हा जेव्हा ती मोठ्या पडद्यावर येते तिला प्रेक्षकांची भरभरून दाद आणि प्रेम मिळत असतं. भोजपुरी मध्ये रानीला डान्सिंग क्वीन म्हणूनही ओळखले जाते. या अ‍ॅक्ट्रेसने खूपच कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली आहे. तिच्या यशाने अनेकजण चकित झाले आहेत.

https://youtu.be/p5UVL2t74K0

रानीने मेरे रश्के कमर साँगवर केलेला डान्स युट्युबर शेअर केला होता. ज्याला आजही अनेक लोक पाहत आहेत. सर्वांना हा व्हिडीओ भावताना दिसत आहे. अनेकजण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर राणीचे दीवाने होताना दिसत आहे.

2004 साली राणीने भोजपुरी सिनेमात एन्ट्री केली होती. ससुरा बडा पइसावाला या सिनेमातून तिने डेब्यू केला होता. या सिनेमात ती मनोज तिवारी सोबत दिसली होती. या सिनेमात तिच्या अभिनयाचे खूप कौतुक होताना दिसून आले. यानंत तिच्या करिअर ग्राफमध्ये कमालीची वाढ झाली. राणीने बंधन टूटे ना, देवरा बडा सतावेला, गंगा जमुना सरस्वती, रानी चली ससुराल, इंस्पेक्टर चांदनी यांसारख्या अनेक सिनेमात काम केले आहे.

https://www.instagram.com/p/BxJR1LeAI3G/