Rani Mukerji | राणी मुखर्जीचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’चा ट्रेलर प्रदर्शित; ट्रेलर पाहताच क्षणी अंगावर येईल काटा

पोलीसनामा ऑनलाइन : Rani Mukerji | एकेकाळी बॉलीवूड गाजवणारी अभिनेत्री राणी मुखर्जी गेल्या काही वर्षात फार कमी चित्रपटात झळकून आली. त्यातील काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकले नाही. तर आता लवकरच राणी मुखर्जी ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर सध्या या चित्रपटाच्या ट्रेलरची चर्चा जोरात होताना दिसत आहे. (Rani Mukerji)

चित्रपटाच्या नावावरूनच लक्षात आले असेल की हा चित्रपट एक आई आणि तिच्या मुलांवर आधारित असणार आहे. यामध्ये आपल्या मुलांना मिळवण्यासाठी आई देशाविरुद्ध आणि त्या देशाच्या कायद्याविरुद्ध कशा पद्धतीने लढते हे दाखवलेले आहे. चित्रपटाचा ट्रेलर सध्या प्रेक्षकांना फारच आवडल्याचे दिसत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात कोलकत्ता सोडून नॉर्वेमध्ये स्थायिक झालेल्या मिसेस चॅटर्जीवरून होते. यात तिचा नवरा आणि दोन मुले असा सुखी कुटुंब असतो. मात्र एके दिवशी अचानक या कुटुंबावर मोठे संकट आल्याचे दाखवण्यात आले. तर नार्वे देशातील कायद्याची दखल देत तिची दोन्ही मुलं तिच्याकडून लांब केली जातात. ती एक चांगली आई नाही ती एक मानसिक रुग्ण आहे असा दावा करून तिच्याकडून तिची मुलं घेतली जातात. या घटनेनंतर मिसेस चटर्जी संपूर्ण आयुष्य आपल्या मुलांना मिळवण्यासाठी झटत असते. या परिस्थितीत आपल्या मुलांना मिळवण्यासाठी त्या देशाविरुद्ध त्याचबरोबर त्यांच्या कायदेशीर पद्धतीत ती लढा देते. त्यादरम्यान तिला काय काय भोगावे लागले हि संपूर्ण कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. (Rani Mukerji)

 

 

या चित्रपटात राणीचा दमदार अभिनयही दिसत आहे. या चित्रपटात बऱ्याच गोष्टी फार बारकाईने दाखवण्यात
आले आहेत. जसे की मुलांना हाताने खाऊ घालणे ,आपल्या शेजारी झोपवणे, त्यांच्यावर प्रेम करणे,
माया करणे त्याचबरोबर या गोष्टी जेव्हा त्यांच्या विरोधात वापरल्या जातात तेव्हा कशा पद्धतीने आपण या
गोष्टीचा सामना करावा हे यातून उत्तम दाखवण्यात आले आहे. या चित्रपटातील अनेक दृश्य पाहून अंगावर
काटा उभारल्या शिवाय राहत नाही. तर हा चित्रपट 17 मार्च 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटात राणी मुखर्जी बरोबर अनिर्बन भट्टाचार्य, जिम सरभ आणि नीना गुप्ता यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत. तर आशिमा छिब्बर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Advt.

Web Title :- Rani Mukerji | mrs chatterjee vs norway official trailer starring rani mukerji jim sarbh neena gupta

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aurangabad Crime News | धक्कादायक ! आर्थिक विवंचनेतून शेतकरी दाम्पत्याने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

MPSC | नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू, MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश, आयोगाकडून विद्यार्थ्यांची मागणी मान्य

Pune Kasba Peth Bypoll Election | श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांचा आणि त्यांच्या कुटूंबियांचा भाजप उमेदवार हेमंत रासने यांना जाहीर पाठिंबा