…म्हणून ‘राणी मुखर्जी’ झाली ट्रोल

मुंबई : वृत्तसंस्था – ‘मीटू’ या मोहिमे अंतर्गत संपूर्ण बॉलिवूड हादरून निघाले तनुश्री दत्ताने या मोहिमेला वाचा फोडली आणि बघता बघता अनेक महिलांनी ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत लैंगिक गैरवर्तनाच्या प्रकरणांविरोधात आवाज उठवला. या प्रकरणात साजिद खान, रजत कपूर, आलोक नाथ, सुभाष घई, अन्नू मलिक अशा अनेक बड्या लोकांची नावे समोर आली.

आता राणी मुखर्जीच्या एका विधानामुळे. पुन्हा एकदा ‘मीटू’ मोहिम सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.  एका वाहिनी वर ‘मीटू’ मुद्यावरील चर्चेसाठी राणी मुखर्जी, दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा, आलिया भट्ट अशा अनेक अभिनेत्रींना निमंत्रित केले होते . या चर्चेदरम्यान राणीने असा काही मुद्दा मांडला की, त्यामुळे ती सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे.

 ‘मीटू’ वर चर्चा करताना राणीने मुलींना मार्शल आर्ट्स शिकण्याची गरज व्यक्त केली. मुलींनी,महिलांनी स्वत:च्या संरक्षणासाठी मार्शल आर्ट्स शिकावे. शाळेच्या अभ्यासक्रमातही याचा समावेश व्हावा. स्वसंरक्षणासाठी महिलांनी समर्थ असावे, असे राणी म्हणाली. पण राणीचे हे मत दीपिका पादुकोणला जराही पटले नाही.

तिने राणीला मध्येच थांबवत, मुळात मार्शल आर्ट्सची गरजचं का पडावी? असा सवाल उपस्थित केला. महिलांसाठी वातावरण इतकं सुरक्षित असायला हवे की, त्यांना स्वसंरक्षणासाठी अशा गोष्टी शिकण्याची गरजचं भासू नसे. मार्शल आर्ट्स शिकावे पण त्यापूर्वी लोकांची मानसिकता बदलली गेली पाहिजे, असे रोखटोक मत दीपिकाने मांडले. दीपिकाची ही बाजू घेत आलिया व अनुष्कानेही हा मुद्दा उचलून धरला . बघता बघता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मग काय, नेटकऱ्यांनी राणीवर चांगलाच निशाणा साधला.