अभिनेत्री राणीचा ‘मर्दानी 2’ हिट ! अवघ्या 5 दिवसात ‘एवढ्या’ कोटींची कमाई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार राणी मुखर्जीचा मर्दानी 2 हा सिनेमा नुकताच रिलीज झाला होता. या सिनेमानं रिलीजनंतर अवघ्या 5 दिवसांतच 23.65 कोटींची कमाई केली आहे. राणीच्या मर्दानी 2 सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पोलिसाच्या भूमिकेतील मर्दानी राणी सर्वांनाच भावली आहे. राणीच्या अभिनयाचं मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसत आहे.

गोपी पुथरन दिग्दर्शित सिनेमा मर्दानी 2 च्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर पहिल्या दिवशी या सिनेमानं 3.80 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी 6.55 कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी 7.80 कोटी, चौथ्या दिवशी 2.85 कोटी आणि पाचव्या दिवशी 2.65 कोटी कमावत या सिनेमानं एकूण 23.65 कोटींचा गल्ला जमवला आहे. 13 डिसेंबर रोजी सिनेमा रिलीज झाला आहे.

2014 साली आलेल्या मर्दानी या सिनेमाच्या पहिल्या विकेंड कलेक्शनला मर्दानी 2 सिनेमाच्या कलेक्शननं मागे टाकलं आहे. मर्दानी या सिनेमानं पहिल्या आठवड्यात 14.46 कोटी कमावले होते. राणीचा 2018 साली आलेला हिचकी या सिनेमानं 15.35 कोटी कमावले होते.

मर्दानी 2 सिनेमात राणीनं आयपीएस अधिकारी शिवानी शिवाजी रॉयची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा महिलांसोबतच्या छेडछाडीच्या खऱ्या घटनांवर आधारीत असलेला सिनेमा आहे. ट्रेलरमध्येही याचा स्पष्ट उल्लेख दिसत आहेत. सिनेमात राणी दबंग अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे जी सिरीयल रेपिस्टला पकडण्याचा प्रयत्न करत आहे ज्यानं अनेक महिलांचा रेप केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/