‘खिलाडी’ अक्षयच्या ‘सूर्यवंशी’मध्ये महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार राणी मुखर्जी ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम  – रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासू चर्चा सुरू आहे. या सिनेमात अक्षय कुमार, कॅटरीना कैफ आणि रोहित शेट्टी पहिल्यांदाच काम करताना दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वीच अशी माहिती समोर आली होती की, या कॉप फ्रेंचायजी सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये पहिल्या आणि दुसऱ्या पार्टमधील काही स्टार्स दिसणार आहेत. अजय देवगण, रणवीर सिंग आणि अक्षय कुमारला घेऊन रोहित शेट्टी मेगा क्लायमॅक्स तयार करणार आहे. आता एका रिपोर्टनुसार अशी माहिती आहे की, रणवीर, अक्षय आणि अजय यांच्याव्यतिरीक्त अभिनेत्री राणी मुखर्जी देखील या सिनेमाच्या क्लायमॅक्स दिसण्याची शक्यता आहे.

एका इंग्रजी वृत्तानं दिलेल्या माहितीनुसार, रोहित शेट्टीला या सिनेमाच्या क्लायमॅक्ससाठी स्ट्राँग महिला पोलीस हवी होती. यासाठीच राणीची निवड करण्यात आली असावी. ती या सिनेमात दिसण्याची शक्यता आहे. अद्याप अधिकृतपणे मात्र या गोष्टीची पुष्टी झालेली नाही. परंतु असं म्हटलं जात आहे की, सिनेमात अक्षय, रणवीर आणि अजयसोबत राणी मुखर्जीदेखील आपल्या अंदाजात विलेनला भिडताना दिसणार आहे. राणीनं याआधी मर्दानी आणि मर्दानी 2 या सिनेमात फीमेल कॉपची भूमिका साकारली आहे.

सूर्यवंशी या सिनेमात अक्षय कुमार आणि कॅटरीना कैफ लिड रोलमध्ये आहेत. या सिनेमाच्या निमित्तानं कॅट आणि अक्षय दीर्घकाळानंतर एकत्र काम करताना दिसणार आहेत. 24 मार्च 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.