राईनपाडा हत्याकांड प्रकरणी; २७ आरोपींना कोठडी

धुळे : पोलीसनामा आॅनलाईन

मुले पळविणारी टोळी म्हणून जमावाने पाच भिक्षुकांची हत्या केल्याची धक्कादायक घटना धुळे जिल्हयातील राईनपाडा या ठिकाणी घडली होती. या हत्येप्रकरणी आता  २५ आरोपींना न्यायालयीन कोठडी तर दोन आरोपींना पोलीस कोठडी ठोठवण्यात आली असून, सदरचा आदेश साक्री न्यायालयाने सोमवारी दिला आहे. दुपारी पोलीस बंदोबस्तात सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’df831acd-8419-11e8-b1aa-4728cc6e414f’]
साक्री तालुक्यातील राईनपाडा या आदिवासीबहुल भागात १ जुलै रोजी हत्याकांड घडले होते. अफवेमुळे निर्माण झालेल्या संशयातून मंगळवेढा येथील पाच निरपराध भिक्षुकांना जमावाने ठेचून मारले होते. याप्रकरणी आत्तापर्यंत २७ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पिंपळनेर पोलीस ठाण्यात १२ प्रमुख संशयितांसह जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी २३ संशयितांना अटक केली होती. १२ प्रमुख फरार संशयितांपैकी चाैघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. रविवारी दशरथ पिंपळसे व गुलाब पाडवी यांना अटक करण्यात आली.

करमाळा तहसीलवर कार्यालयावर नाथपंथीय डवरी समाजाचा मोर्चाः

साक्री येथे घडलेल्या हत्याकांडाच्या निषेधार्थ नाथपंथीय डवरी समजाच्या वतीने सोमवारी करमाळा तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. राईनपाडा हत्याकांडातील आरोपींना जलद न्यायालयात खटला चालवून तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, पीडीत कुटुंबाच्या वारसदारांना शासकीय सेवेत सहभागी करुन घ्यावे. तसेच प्रत्येक पीडिताच्या कुटूंबाला २५ लाखाचे आर्थिक सहाय्य करावे. अशा विविध मागण्या या मोर्चात करण्यात आल्या आहेत.

धुळे : मुले पळवणारी टोळी समजून मारहाण, 5 जणांचा जागीच मृत्यू

राईनपाडा घटनेतील प्रमुख हल्लेखोर अटकेत

राईनपाडा नरसंहार खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार : मुख्यमंत्री