रांजणगावमध्ये बँकेचे एटीएम फोडून २४ लाखांची रोकड लंपास

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती मंदिराजवळ असलेल्या बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून चोरट्यांनी २४ लाख २६ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार रविवारी (दि.१ जुलै) रोजी पहाटे ३ च्या सुमारास घडला आहे. घटनेची माहिती मिळताच रांजणगाव पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासून तपास सुरु केला आहे.

या प्रकरणी सचिन उत्तमराव बाबर (धनकवडी, पुणे) यांनी रांजणगाव गणपती औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करुन चोरट्यांच्या मागावर पथके रवाना करण्यात आली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.१ जुलै) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत संदीप बांदल यांचे जागेत असेलेल्या बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने फोडले. चोरट्यांनी मशिनच्या डिस्प्लेच्या खालील भाग कापून आतमधील ५०० आणि २००० रुपयांचाय नोटा चोरून नेल्या. चोरट्यांनी ५०० रुपयांच्या २७०० नोटा व दोन हजार रुपयांच्या ५३८ नोटा असे एकूण चोवीस लाख २६ हजार रुपये असणारे एकूण पाच कॅश ट्रे चोरी करून नेले.

सचिन बाबर यांच्या तक्रारीनुसार रांजणगाव गणपती औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव करत आहेत.

निद्रानाशाच्या गंभीर समस्येवर करा ‘हे’ घरगुती सोपे उपाय

केसांच्या प्रकारावरून निवडावे ‘तेल’, तरचं होईल ‘योग्य पोषण’

‘थर्माकॉल’च्या कपात चहा पिणे आरोग्यासाठी घातक ; जाणून घ्या साइड इफेक्ट्स

आरोग्याच्या ‘या’ समस्या किरकोळ असल्या तरी घ्या ‘डॉक्टरां’चा सल्ला