रांजणगाव गणपती : ‘श्री’ची ‘मुक्तदार’ याञा भाद्रपद द्वारयाञा यंदा रद्द, जिल्हाधिकाऱ्यांचं देवस्थानाला पत्र

, : प्रतिनिधी (सचिन धुमाळ) –  पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील अष्टविनायक क्षेत्रापैकी एक असलेल्या रांजणगाव गणपती येथील श्री ची “मुक्तदार” म्हणजे भाद्रपद महोत्सव याञा या वर्षी साजरी करु नये असे पञ जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रांजणगाव गणपती देवस्थानला दिले. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकार कढून धार्मिक कार्यक्रम आणि मांदिर उघडण्यास अजून परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे अष्टविनायकांपैकी एक असलेल्या रांजणगाव येथील गणपती मंदिर गेल्या अनेक दिवसापासून बंद आहे. मात्र दरवर्षी प्रमाणे भाद्रपद द्वारयाञा भरणार की नाही याबाबत ग्रामस्थांमध्ये व भाविंकामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत देवस्थानच्या विश्वस्तांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी पञ व्यवहार करुन याञा भरवण्यास परवानगी मागितली होती.

माञ रांजणगाव येथील कोरोना रुग्णांची संख्या २५ वर पोहोचली होती. यातील १३ !रुग्ण बरे झाले असून १२ जणांवर उपचार चालू आहेत. याचा विचार करुन जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी ३१ आँगस्ट पर्यंत कोणतेही धार्मिक कार्यक्रम साजरे करु नये असे पञ देवस्थानला दिले आहे. तर भाद्रपद महोत्सवाला या ठिकाणी दरवर्षी चार ते पाच लाख भाविक दर्शनासाठी येत असतात. तसेच रांजणगाव येथील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन गर्दी टाळण्यासाठी कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाला परवानगी नसल्याने दरवर्षी प्रमाणे होणारा “श्री “मुक्तदार याञा यावर्षी दि. २०/०८/२०२० ते २५/०८/२०२० या कालावधीतील होणारी भाद्रपद द्वारयाञा हा धार्मिक सोहळा करता येणार नसल्याचे पञात नमुद करण्यात आले आहे.