Ranjangaon Mahaganpati | ड्रेसकोडबाबत तुळजापूरनंतर रांजणगाव देवस्थान ट्रस्टने दिले स्पष्टीकरण

रांजणगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Ranjangaon Mahaganpati | महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींपैकी एक असलेला शिरूर तालुक्यातील श्री क्षेत्र रांजणगाव गणपतीच्या मंदिर परिसरात शॉर्ट कपडे घालून येण्यास बंदी आहे, अशा आशयाचे फलक लागलेले दिसले. मात्र आज रांजणगाव देवस्थान ट्रस्टने (Ranjangaon Ganpati Mandir Trust) याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Ranjangaon Mahaganpati)

काल (दि.१८) महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूर (Tuljapur) मंदिर परिसरातही तोकडे कपडे घालण्यास बंदी आहे, असे बॅनर प्रसिद्ध झाले होते. मात्र समाज माध्यमांवरील जहरी टीकेमुळे तुळजापूर देवस्थानलाही याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले. तुळजापूर देवस्थानाकडूनही सांगण्यात आले की, असे कोणतेही बॅनर लावण्याचे आदेश मंदिर प्रशासनाने दिलेच नाहीत किंवा तसा ठराव देखील झालेला नाही, असे तुळजाभवानी संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे (Dr. Sachin Ombase) यांनी स्पष्ट केले. आता रांजणगाव गणपती देवस्थानानेही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. (Ranjangaon Mahaganpati)

देवस्थानच्या अध्यक्ष स्वाती पाचुंदकर (Swati Pachundkar) यांनी याबाबत देवस्थानचे मत मांडले आहे. अशा प्रकारचा कोणताही निर्णय देवस्थानने घेतलेला नाही. शिवाय देवस्थानच्या वतीने कुठेही या आशयाचे फलक अधिकृतरित्या लावण्यात आलेले नाहीत. देवस्थानच्या अधिकृत संकेस्थळावर कुठेही अशा पोस्ट नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

अष्टविनायकांपैकी एक असलेला रांजणगावचा महागणपती (Ranjangaon Mahaganpati) हा अनेकांचे
श्रद्धास्थान आहे. अनेक गणेश भक्त भक्तीभावाने येथे माथा टेकवतात व पुजा करतात.
मात्र कालच्या व्हायरल झालेल्या मेसेजमुळे (Viral Message) अनेकांनी या ड्रेसकोडच्या निर्णयामुळे मंदिर
ट्रस्टवर ताशेरे ओढले. दरम्यान, आज देवस्थानच्या अध्यक्षांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे भाविकांच्या मनातील संभ्रम दूर झाला आहे.

Web Title :   Ranjangaon Mahaganpati | Ranjangaon Devasthan Trust gave clarification after Tuljapur regarding dress code

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

DPDC Meeting Pune | जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दगडूशेठ गणपती देवस्थानला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा ! जिल्ह्यात ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजना राबविणार-पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Maharashtra Politics News | ‘…तर बावनकुळेंनी बारामतीमधून अजितदादांच्या विरोधात निवडणूक लढवावी’, राष्ट्रवादीच्या आमदाराचं खुलं आव्हान

Pune Crime News | सोलापूरचे तोतया पत्रकार हनमे बंधूंनी बडया बिल्डरकडे देखील मागितली होती खंडणी; 50 लाख अन् 2 फ्लॅटची होती डिमांड, जाणून घ्या प्रकरण