जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना रांजणगाव एमआयडीसी पोलीसाकडून अटक; धारदार हत्यारे जप्त

शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरूर Shirur तालुक्याच्या रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत जबरी चोरी Theft करणाऱ्या आरोपींना रांजणगाव पोलिस स्टेशनच्या Ranjangaon MIDC Police पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक Arrest केली असून आरोपींकडून धारदार हत्यारे जप्त करण्यात आली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत पुणे नगर महामार्गावर Pune Nagar Highway फैसल मलिक इजाज अहमद मोमीन हे रात्रीच्या सुमारास मित्रांसोबत जात होते. यावेळी अचानक पल्सर दुचाकीवरून येऊन तीन व्यक्तींनी अपघात केला असल्याचे सांगत थांबविले.यावेळी आरोपींनी चाकूचा धाक दाखवून खिशातील पैसे काढून घेतले. तसेच पेट्रोल पंपावर नेऊन एटीएम मधून दहा हजार रुपये रक्कम काढून घेतली. हा प्रकार घडत असताना गाडीत असणाऱ्या मित्राने पोलिसांना सदर घटनेची माहिती कळवून लोकेशन पाठविले.

यावेळी रांजणगाव पोलिसांनी Ranjangaon Police देखील घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ धाव घेत आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न केला असता,
दोन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले मात्र एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.
या प्रकरणी रितेश वाल्मीक वाळके (वय.29) व अजय सुर्यगंध (वय. 25. दोघेही रा. मांडवगण फराटा) या आरोपींना ताब्यात घेतले.
तर कारेगाव येथील एका खोलीत फरार असलेल्या ऋतिक बंडू परदेशी (रा. सादलगाव) यास पोलिसांनी ताब्यात घेतले.
ऋतिक याच्या खोलीची तपासणी करत असताना पोलिसांना तीन तलवारी मिळून आल्या.
तर अटक Arrest केलेल्या आरोपींकडून 13,500 रुपये रक्कम, चाकू, मोटारसायकल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा Crime दाखल केला आहे.

हा तपास रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत Inspector of Police Suresh Kumar Raut यांच्या मार्गदर्शनाखाली
सहायक पोलिस निरीक्षक संदीप येळे, पोलिस उपनिरीक्षक सुभाष मुंढे, अनिल चव्हाण, रघुराज हळनोर, प्रकाश वाघमारे, उमेश कुतवळ, विजय शिंदे, साबळे यांच्या पथकाने केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Titel : Ranjangaon MIDC police arrest accused of robbery Sharp weapon seized

हे देखील वाचा

PM-Kisan | 10.34 कोटी शेतकर्‍यांना मिळाला पीएम किसानच्या आठव्या हप्त्याचा लाभ, लवकर करा रजिस्ट्रेशन

Modi Government | खुशखबर ! मोदी सरकार घरबसल्या देत आहे 2 लाख रुपये; केवळ 30 जूनपूर्वी करावे लागेल ‘हे’ काम