शासकीय कर्तव्य बजावत असताना शिवीगाळ दमदाटी करत कामात अडथळा, रांजणगाव MIDC पोलिसांत तिघांवर FIR

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दिलेल्या आदेशानुसार दंडात्मक कारवाई करीत असलेल्या पोलीस पथकावर तुमचा “पावत्या फाडायचा काय संबंध” असे म्हणत पोलिसांवर हल्ला करून मारहाण ,शिवीगाळ दमदाटी, करत शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी तिघां जणांवर रांजणगाव औद्योगिक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे.

या प्रकरणी प्रवीण साहेबराव भोगावडे (वय २९ वर्षे) , बाळासाहेव विठ्ठल भोगावडे , सत्यवान दिलीप भोगावडे (वय २४ वर्षे, तिघे रा. गाणेगाव खालसा ता. शिरूर जि. पुणे)या तिघांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती नुसार पोलिस कर्मचारी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दिलेल्या सुचनांनुसार विना मास्क व सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्या लोकांवर पावती फाडून दंडात्मक कारवाई करत शासकीय कर्तव्य बजावत असताना गणेगाव खालसा (ता. शिरूर पुणे) गावच्या हद्दीत ओम साई किराणा स्टोअर्स या दुकानाचे समोर मलठण शिक्रापुर रोडवर दंडात्मक कारवाई करत शासकीय कर्तव्य बजावत असताना वरील आरोपीनी संगनमताने तुम्ही गरीब लोकांना लुटत आहे. तुमचा काय संबंध पावत्या पाडायचा, चोऱ्या करणे बंद करा.असे म्हणत पोलिसांना शिवीगाळ करून, माजल्यात सगळे बोकड असे म्हणून अंगावर धावून येऊन हाताने पोलिसांना मारहाण करून पोलिस कर्मचारी बजावत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण करून अश्लील भाषेत शिवीगाळ दमदाटी केली.

याबाबत रांजणगाव पोलीस स्टेशन येथे तिघांवर गुन्हा दाखल झाला असून त्यातील प्रवीण साहेबराव भोगावडे, सत्यवान दिलीप भोगावडे या दोघा अटक केली आहे. याबाबत पुढील तपास रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक पी. पी. कदम करीत आहे.