हिंदू महासभेच्या नेत्याच्या पत्नीनं 50 लाख नुकसान भरपाई आणि सरकारी नोकरी सहित ‘या’ गोष्टींची केली मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विश्व हिंदू महासभेचे नेता रणजित बच्चनची पत्नी कालिंदी निर्मला शर्मा यांनी योगी आदित्यनाथ सरकारकडे 50 लाख रुपयांसहित अनेक मागण्या केल्या आहेत. माझ्याकडे राहण्यासाठी घर नसल्याने सरकारने मझ्या निवाऱ्याची सोय करावी तसेच सरकारी नोकरी देखील देण्यात यावी अशी मागणी निर्मला शर्मा यांनी केली आहे.

ज्यावेळी रणजित यांचे पार्थिव आणण्यात आले त्यावेळी त्यांच्या पत्नीने योगी सरकारला उद्देशून म्हंटले होते की तुमचा हिंदुत्वाचा एक सैनिक कमी झाला, त्याच्या अंतिम क्षणासाठी त्याला भगवा कपडा द्या. मी समाज सेवा करीत होते आणि जे मिळेल ते समाजासाठीच खर्च करत होते असे मत पत्नी कालिंदी निर्मला शर्मा यांनी यावेळी व्यक्त केले होते.

त्या म्हणाल्या की आम्ही मुख्यमंत्री योगी यांच्यासाठी काम करत नव्हतो तर, हिंदूंना जागृत करण्यासाठी आणि सामाजिक कामे करण्यासाठी घरातून कपडे एकत्रित करणे आणि त्यांना गरीब मुलांना देणे अशा प्रकारची कामे करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. सरकारने माझी राहण्याची आणि रोजगाराची सोय करावी तसेच मला आर्थिक मदत देखील करावी अशी मागणी रणजित यांच्या पत्नीने केली आहे.

मॉर्निंग वॉकला जाताना केली होती हत्या
लखनऊ येथे विश्व हिंदू महासभेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष रणजित बच्चन यांची भर दिवस गोळ्या मारून हत्या करण्यात आली होती. हजरतगंज या पॉश परिसरात झालेल्या या हत्येमुळे एकच खळबळ उडाली होती. रणजित हे आदित्य कुमार श्रीवास्तव यांच्या सोबत मार्निंग वॉकसाठी गेले होते त्यावेळी हा प्रकार घडला. पोलिसांनी या तपासासाठी सहा टीम बनवल्या आहेत तसेच सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना याप्रकरणी निलंबित करण्यात आलेले आहे. यामध्ये चौकी इंचार्ज आणि चार पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आदित्य याना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सध्या सुरु आहे.