माढ्यात आघाडी पिछाडीचा खेळ, रणजीतसिंह नाईकनिंबाळकर ५४२३ मतांनी आघाडीवर

माढा : पोलीसनामा ऑनलाईन – माढ्यात आघाडी पिछाडीचा खेळ सुरु आहे. माढ्यात भाजपचे रणजीतसिंह नाईकनिंबाळकर हे सध्या ५४२३ मतांनी आघाडी घेतली आहे. रणजीतसिंह नाईकनिंबाळकर आणि राष्ट्रवादीचे संजयमामा शिंदे यांच्यात कांटे की टक्कर सुरु आहे.

मोदी लाटेत राष्ट्रवादी कॉंग्रेसने माढा मतदारसंघ राखला होता. त्यावेळी विजयसिंह मोहिते पाटील यांनी स्वाभीमानीचे सदाभाऊ खोत यांचा पराभव केला होता. यावेळी येथे भाजपने रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली.

तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने संजयमामा शिंदे यांना उमेदवारी देऊन भाजपसमोर तगडं आव्हान उभं केलं. तर वंचित बहुजन आघाडीचे अड. विजयराव मोरे यांनी धडाकेबाज प्रचार करून जोरदार हवा केली होती.