Coronavirus Impact : रिकाम्या स्टेडियममध्ये होणार रणजी फायनलच्या 5 व्या दिवसाचा खेळ

राजकोट : वृत्तसंस्था – बंगाल आणि सौराष्ट्रमधील रणजी ट्रॉफी फायनलच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवसाचा खेळ कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयने गुरुवारी ही माहिती दिली. बीसीसीआय महाव्यवस्थापक सबा करीम यांनी म्हटले की, शेवटच्या दिवशी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी असणार नाही. केवळ खेळाडू, सामना अधिकारी आणि मीडियाला परवानगी असेल.

हा निर्णय क्रिडा मंत्रालयाशी विचारविनिमय करून घेण्यात आला आहे. क्रिडा मंत्रालयाने सर्व क्रिडा महासंघांना खेळासाठी गर्दी जमवू नये, आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या धोक्यामुळे दक्षिण आफ्रिकासोबत उर्वरित वनडे सीरीजच्या दोन मॅच रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवण्यात येतील. कोरोना व्हायरसच्या भितीचा हा परिणाम आहे की, सीरीजचे उर्वरित दोन सामने बंद दरवाजाच्या मध्ये रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवण्यात येऊ शकतात.

बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे भारत-दक्षिण अफ्रिकेमधील वनडे सीरीजच्या दोन मॅच रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवल्या जाऊ शकतात. कोरोना व्हायरस आणि खराब हवामानाचा परिणाम तिकिट विक्रीवरसुद्धा पडला होता. दुसरी वनडे मॅच 15 मार्चला लखनऊमध्ये आणि तिसरी मॅच 18 मार्चला कोलकातामध्ये खेळवण्यात येईल.