महाराष्ट्राच्या ‘गरुजी’स ७ कोटींचा ‘ग्लोबल टीचर प्राईझ पुरस्कार’

सोलापूर: पोलिसनामा ऑनलाईन – युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राईझ सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाला आहे . ७ कोटी रुपयांचा हा पुरस्कार आहे. डिसले यांनी क्युआर कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून केलेल्या कामाची दखल घेत हा पुरस्कार जाहीर केला आहे.

लंडन मधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी या पुरस्काराची अधिकृत घोषणा केली असा पुरस्कार मिळणारे डिसले हे पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. जगभरातील १४० देशांतील १२ हजार हुन शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा केली.

पुरस्काराची ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील शिक्षकांना देणार
रणजितसिंह डिसले यांना हा पुरस्कार जाहीर झाला असल्याचे समजताच डिसले कुटुंबासह त्यांच्या गावी एकच जल्लोष झाला. दरम्यान डिसले यांनी पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना देण्याचे जाहीर केले असून, यामुळे ९ देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. एवढेच नाही तर मिळालेली रक्कम टीचर इनोव्हेशन फंडकरिता वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे शिक्षकांमधील नवोपक्रमशिलतेला चालना मिळणार आहे.