भाजप प्रवेशानंतर रणजितसिंहांनी वडिलांबाबत केले सूचक विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यसभेचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या भाजप प्रवेशाची भूमिका माध्यमात स्पष्ट केली आहे. २ कोटी जनतेच्या हिताचा प्रश्न असलेल्या कृष्णा भीमा स्थिरीकर प्रकल्पा बाबत भाजप पक्ष सकारात्मक असल्याने आपण भाजपमध्ये प्रवेश केला आहे असे रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले आहेत.

आपण भाजपमध्ये आणि आपले वडील राष्ट्रवादीत असे चित्र मोहिते पाटील परिवारात बघायला मिळणार आहे का असे विचारताच रणजितसिंह यांनी आपल्या वडिलांबाबत सूचक विधान केले आहे. भाजपची मला उमेदवारी मिळाल्यानंतर माझ्या पाठीशी वडिलांचे आशीर्वाद राहतील. कारण काही झाले तरी ते माझे वडील आहेत असे रणजितसिंह म्हणाले आहेत.

२००९ सालापासून राष्ट्रवादीत होणाऱ्या खच्चीकरण्याच्या राजकारणाला कंटाळून रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या रणजितसिंह मोहिते पाटील यांना राष्ट्रवादीने अनेक वर्ष व्हिजनवासात ठेवले. राष्ट्रवादीच्या या धोरणाला कंटाळून रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.