भाजप खासदार नाईक निंबाळकरांची रामराजे निंबाळकरांवर ‘नीच’ पातळीची टीका

फलटण : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूरातील माढा लोकसभा मतदारसंघात भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ८५ हजारांच्या मतांनी बाजी मारली. त्यानंतर विजयीसभाही आयोजित करण्यात आली. यावेळी त्यांनी मात्र एक चुक केली आहे. विजयाच्या आनंदात भाषणादरम्यान विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकरांवर जोरदार टीका केली. टीका करताना त्यांची जीभ घसरली आहे. माझा डीएनए तपासा, ९६ पिढ्या नाईक निंबाळकरच निघतील, मात्र रामराजे बिनलग्नाची औलाद, असं वादग्रस्त वक्तव्य रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

मी ओरिजनल नाईक-निंबाळकर आहे. माझा डीएनए तपासला तर या रणजितसिंहाच्या ९६ पिढ्या नाईक-निंबाळकरच निघतील. परंतु तुमचं काय? तुम्ही स्वत:ला नाईक-निंबाळकर म्हणवता, आणि मी नाईक-निंबाळकर नाही म्हणून सांगता? तुमच्या आईचं आणि वडिलाचं लग्न झालं असेल? त्या लग्नाचा दाखला मला दिला तर त्याला एक हजाराचं बक्षिस देईन, असं खालच्यापातळीला जाऊन त्यांनी टीका केली. तसंच रामराजे ही बिनालग्नाची औलाद आहे, हा इतिहास आहे. रामराजेंच्या वडिलांना मालोजीराजेंनी घरात घेतलं नव्हतं. त्यामुळे मला वाईट बोलायचं नव्हतं, परंतु बोलावं लागलं, असंही रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी यावेळी म्हटलं. त्यांच्या या टीकेवर अद्याप कोणाचीही प्रतिक्रिया आली नाही.

दरम्यान, माढ्याच्या राजकारणात यंदा अनेक नाट्यमय घडोमोडी पाहायला मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून उमेदवारी जाहीर केली. नतंर त्यातून माघारही घेतली. माढ्यातील राष्ट्रवादीचे माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाजपला उघडपणे मदत केली, तर त्यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीला या मतरदारसंघात मोठे धक्के मिळाले, त्यानंतर शरद पवार यांनी माढ्यातून संजयमामा शिंदे यांना उमेदवारी दिली. मात्र राष्ट्रवादीला येथे यश संपादन करता आले नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like