रांका ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्याला मारहाण करुन डायमंड लुटले

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन-

मुंबईहून पुण्याला हिरे घेऊन येणाऱ्या  रांका ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्याला मारहाण करुन लुटल्याची खळबळजणक  घटना आज (शुक्रवार) रोजी रेल्वे स्टेशन च्या फलाट क्रमांक 6 वर घडली आहे. बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीत सदरचा प्रकार घडला असून, चार हिऱ्यांचे पाकीट लुटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
[amazon_link asins=’B00RBGYGMO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ab1c4434-918e-11e8-909b-2318b6e71541′]

संबंधीत व्यक्ती रांका ज्वेलर्समध्ये काम करत आहे. तो मुंबईवरून पुण्यात हिरे घेऊन येत होता. तो फलाट क्रमांक 6 वर उतरुण बाहेर पडत असताना, अचानक अज्ञात चार लोकांनी त्याला मारहाण करत हिऱ्याची बॅग घेऊन पळ काढला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीवरुन, अज्ञात इसमाच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र फिर्यादीचा नेमके किती हिरे चोरी गेले आहेत याची माहिती अद्याप देखील मिळू शकलेली नाही. पोलीस पुढील तापास करीत आहेत.