राणेंची पार्श्वभुमी दरोडेखोर – लुटारूंची, शिवसेनेवर टीका करायची हिंमत नाही

कणकवली : पोलीसनामा ऑनलाईन – नारायण राणे ज्या ज्या पक्षात गेले त्या पक्षांची अवस्था बघा, मुख्यमंत्र्यांनी 4 शब्द चांगले सांगितले तरी खोड काही जाणार नाही. राणेंची पार्श्वभूमी दरोडेखोराची, लुटारुंची आहे, जिल्ह्यात निवडणुकीत पडलेले नरबळी त्यांचेच पाप आहे अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर टीका केली आहे.

नारायण राणेंवर टीका करताना विनायक राऊत म्हणाले की , ‘कणकवलीत विजय शिवसेनेचा होणार आहे. सिंधुदुर्गातील तिन्ही मतदारसंघात धनुष्यबाण निवडून येणार आहे. बळी दिल्याशिवाय नारायण राणेंची निवडणूक होत नाही. शिवसेनेच्या वचननाम्याची थट्टा, कुचेष्टा केलेल्या नारायण राणेंची जुळणार कसं ? राणेंची पार्श्वभूमी दरोडेखोराची, लुटारुंची आहे, जिल्ह्यात निवडणुकीत पडलेले नरबळी त्यांचेच पाप आहे. मागच्या ५ वर्षात कोणताही हल्ला न करता मतदान होतं, कोणतंही मतदान केंद्र असवंदेनशील राहिलं नाही शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील वैर संपण्याची शक्यता नाही, राणे यांच्या विकृतीशी आमचा लढा आहे. नारायण राणे ज्या ज्या पक्षात गेले त्या पक्षांची अवस्था बघा, मुख्यमंत्र्यांनी 4 शब्द चांगले सांगितले तरी खोड काही जाणार नाही. नारायण राणेंनी कालच्या भाषणात सांगितले की, मी शिवसेनेवर टीका करण्याची सुरुवात करणार नाही पण सुरुवात करायची नारायण राणेंची हिंमत नाही.’

नारायण राणे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्यापासून शिवसेना आणि राणे यांच्यात वाद सुरु आहेत. राज्यात भाजप शिवसेनेची जरी युती झाली असली तरी कणकवली विधानसभा मतदारसंघात ते आमनेसामने आले आहे. कणकवलीत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप उमेदवार नितेश राणे यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे आज सतीश सावंत यांच्यासाठी प्रचारसभा घेणार आहेत.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी