Ransom Case | खंडणी प्रकरण ! ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई केलेल्या ‘त्या’ बडतर्फ पोलिसाचा जामीन फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   डॉक्टरला पळवून नेत त्याकडून खंडणी (Ransom Case) उकळल्याप्रकरणातील बडतर्फ पोलिसाचा जामीन अर्ज (Bail Application) न्यायालयाने फेटाळला. विशेष मोका न्यायाधिश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला. ransom case | bail reject of police in ransom case

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

समीर जगन्नाथ थोरात (वय ३२, रा. स्वारगेट पोलिस लाईन, मुळ रा. सोलापुर) असे पोलिस शिपायाचे नाव आहे.
या प्रकरणी ४८ वर्षीय स्त्री रोगतज्ञ डॉक्टरने हडपसर पोलिस (Hadapsar Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे.
२९ ते ३१ मे दरम्यान हडपसर (Hadapsar) परिसरात हा प्रकार घडला.
फिर्यादी यांचे हडपसर परिसरात क्लिनिक आहे.
आरोपीसह त्याच्या अन्य साथीदारांनी संगनमत करत फिर्यादी यांना तुम्ही गर्भलिंग तपासणी करून पैसे उकळता, आम्ही सर्वजण पोलिस आहोत असे सांगितले.
प्रकरण मिटवायचे असेल तर दहा लाख रुपये द्यावे लागतील असे म्हणून खंडणीची मागणी केली.
त्यानंतर आरोपींनी फिर्यादीसह त्यांचा एक सहकारी डॉक्टरला जबरदस्तीने चारचाकीमध्ये बसवून घेऊन गेले.
यावेळी, आरोपीच्या साथीदारांनी दोघांना डांबून ठेवून फिर्यादी यांना त्यांनी गर्भलिंग तपासणी केली नसतानाही ती केली आहे, असा गुन्हा दाखल केल्याचे सांगितले.

यावेळी, आरोपींनी बाहेर असलेल्या समीर थोरात याची डीवायएसपी थोरात साहेब अशी ओळख भासवून ते गाडीत बसून आहेत.
तुमची पोलिसांत तक्रार करू त्यामुळे तुमची बदनामी होईल, असे सांगत डांबून ठेवले. तडजोडी अंती फिर्यादी यांनी सात लाख रुपये देण्याचे मान्य केले.
त्यातील पाच लाख ८९ हजार रुपये आरोपींना दिल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणात जामीन मिळावा यासाठी थोरात याने न्यायालयात अर्ज केला.
त्यास विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला.
समीर थोरात याचे गुन्ह्यातील अन्य आरोपींशी घटनेच्या दिवशी ८७ वेळा फोनवरून बोलणे झाले आहे.
गुन्ह्याच्या दिवशी आरोपीचे लोकेशनवरून तो घटनास्थळी उपस्थित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुन्ह्यातील अन्य आरोपींच्या कबुली जबाबात आरोपीचा उल्लेख व कृत्ये सांगितले असल्याचा युक्तिवाद अ‍ॅड. बोंबटकर यांनी केला.
दोन्ही बाजुचा युक्तीवाद एकूण घेत न्यायालयाने जामीन फेटाळला.
सहायक पोलिस आयुक्त कल्याण विधाते या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Web Title : ransom case | bail reject of police in ransom case

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Murder Case | भाच्याच्या खुनाचा बदला, आरोपींचा कोठडीतील मुक्काम वाढला