खंडणी प्रकरण : पत्रकार देवेंद्र जैन, बडतर्फ पोलिस शैलेश जगतापसह महिलेची आणखी पोलिस कोठडी मिळवण्यासाठी पोलिसांकडून अर्ज, न्यायालयानं घेतला ‘हा’ निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दोन कोटींची आणि रास्ता पेठेतील जागा मागत खंडणी प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा पोलीस कोठडी मिळावी यासाठी न्यायालयात दाखल केलेली पुर्नविचार याचिका न्यायालयाने फेटाळली. कोथरुड पोलिसांनी ही याचिका दाखल केली होती. यामुळे पुुणे पोलिसांना मोठा झटका बसला आहे. कोथरुड पोलीस ठाण्यात बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बडतर्फ पोलीस शैलेश जगताप, पत्रकार देवेंद्र जैन आणि एका महिलेला अटक केली होती. तर चव्हाण आणि आरटीआय कार्यकर्ता अद्याप फरार आहे.

कोथरुड पोलिसांनी या तिघांना अटक केल्यानंतर तीन दिवस पोलीस कोठडी मिळाली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. याप्रकरणात त्यांचा जामीन झाला. लागलीच त्यांना समर्थ पोलिसांनी खंडणी व फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे.

सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. दरम्यान कोथरुड पोलीस न्यायालयात परत त्यांना पोलीस कोठडी द्यावी यासाठी पुर्नविचार याचिका न्यायालयात दाखल केली होती. त्यात आज सुनावणी झाली. आरोपींच्या वतीने वकील विजयसिंह ठोंबरे आणि उज्वला पवार यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने पुर्नविचार याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांना मोठा झटका बसला आहे.