‘या’पूर्वी साताऱ्यातील वाईमध्ये ‘दिवे’ लावणाऱ्या हुंबरे वर 40000 च्या खंडणीचा गुन्हा, पुण्यासह राज्य पोलीस दलात प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहर पोलीस दलात सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) म्हणून कार्यरत असणाऱ्या एका अधिकाऱ्याने गुन्ह्यात न अडकविण्यासाठी खंडणी घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सातारा जिल्ह्यात हा प्रकार घडला असून, संबंधित अधिकारी गणवेशात सातारा जिल्ह्यात गेले आणि त्यांना गुन्ह्यात अकविण्याची धमकी देऊन 40 हजार रुपयांची खंडणी घेऊन पुण्यात आले आहेत. दरम्यान पुणे पोलीसांनी प्रकरणाचा अहवाल शासनास सादर केला असून लवकरच निलंबनाची कारवाई अपेक्षित आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली.

सहायक पोलीस आयुक्त दीपक हुंबरे यांच्यावर सातारा जिल्ह्यातील भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 21 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुण भुईंज शहरातील रहिवाशी आहे. तो व्यावसायिक आहे. दरम्यान यातील फिर्यादी याने पंधरा दिवसापूर्वी भुईंज परिसरात गोळीबार केला होता. त्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. पण तो या गुन्ह्यात फरार आहे. यामुळे त्याच्या मित्राकडे चौकशी सुरू होती. फिर्यादी व त्याचा आणखी एक मित्र यांच्या दोघांकडेही चौकशी करण्यात येत आहे.

दरम्यान दीपक हुंबरे यापुर्वी भुईंज येथे उपविभागीय पोलिस अधिकारी होते. यानंतर ते बदलावर पुण्यात आले आहेत. सध्या ते पुण्यात सहाय्यक आयुक्त म्हणून काम करत आहेत.

त्यामुळे त्यांना येथील माहिती आहे. सध्या या पोलीस ठाण्यात बुवा म्हणून एक अधिकारी आहेत. त्यांची आणि उंबरे साहेब यांची ओळख आहे. आठ दिवसांपूर्वी (17 मे) फिर्यादी यांना भुईंज पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले होते. त्यावेळी त्यांना बुवा म्हणून असणाऱ्या अधिकाऱ्यांनी गोळीबार प्रकरणात विचारपूस केली. तसेच त्यांना घरी जाण्यास सांगितले. यावेळी त्यांच्या बुवा यांच्या कॅबिनमधून हुंबरे हे बाहेर निघाल्याचे फिर्यादी यांनी पाहिले होते. बुवा यांनी त्यांना जाण्यास सांगिल्यानंतर काहीवेळाने त्यांना एका क्रमांकावरून फोन आला. तसेच त्यांना डीवायसपी हुंबरे बोलत असून तुम्ही येथील बस स्थानकावर या असे सांगितले. फिर्यादी आणि त्याचा मित्र त्या ठिकाणी गेला. त्यावेळी हुंबरे यांनी त्यांना माझे बुवा यांच्याशी बोलणे झाले आहे. “तुम्हाला यात काही त्रास होणार नाही”. “माझे काय करता बोला” असे सांगितले. अन्यथा या गुन्ह्यात अडकवावे लागेल अशी भीती दाखवत खंडणी मागितली. यावेळी फिर्यादी याच्या मित्राने तुम्हाला किती द्यायचे असे विचारले असता 50 हजार रुपयांची खंडणी मागितली. त्यावेळी इतके पैसे नाहीत म्हणल्यानंतर त्यांना प्रत्येकी 20-20 हजार देण्यास सांगितले. त्यांनतर दोघाकडून 40 हजार खंडणी घेतली.

दरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर सातारा आणि पुणे पोलीस दलात मोठी खळबळ माजली आहे. पुणे पोलिसांना हा प्रकार समाजातच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेत त्यांच्या निलंबन करायची अहवाल शासनास सादर केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सक्तीच्या रजेवर असताना गणवेशात खंडणी घेतली
दीपक हुंबरे पुणे पोलीस दलात आहेत. गेल्या दोन महिन्यापासूनच पुणे पोलीस दलात चर्चेत आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या कामगिरीमुळे त्यांना गेल्या दोन महिन्यांपासून सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. सध्या देखील ते स्तकीच्या रजेवर होते. असे असताना ते गणवेशात गेल्याचे देखील यामुळे समोर आले आहे. दरम्यान त्यांची पोलीस खात्यातून 1 महिन्यानी निवृत्त होणार आहे.