पोलीस, स्वयंघोषित पत्रकार आणि माहिलांनी नामांकित डॉक्टरचे अपहरणकरून उकळली 6 लाख रुपयाची खंडणी

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहर पोलीस दलातील एक कर्मचारी, स्वयंघोषीत पत्रकार व त्यांच्या साथीदारांनी शहरातील एका डॉक्टरला धमकावत कारमधून अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर त्यांना एका ठिकाणी डाबून ठेवत मारहाण करून त्यांच्याकडून पावणे सहा लाख रुपयांची खंडणी उकळल्याचे समोर आला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले आहे. अश्या प्रकारे खंडणी उकळणारी मोठी टोळी असून, त्यांनी अनेकांना गंडविले असल्याचे समोर आले आहे.

पोलीस कर्मचारी समीर थोरात, स्वयंघोषीत पत्रकार प्रदीप ज्ञानदेव फासगे (वय37), कैलास भानुदास अवचिते (वय 38), आरती प्रभाकर चव्हाण (वय 29) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर रंजना वणवे हिच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात 40 वर्षीय डॉक्टर यांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर भागातील एका मोठ्या रुग्णालयात एक महिला गेली होती. तिला तपासणीसाठी आत नेल्यानंतर तिने अचानक आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी या महिलेचे बाहेर थांबलेले दोन साथीदार आत आले. यावेळी तपासणी करण्यास आत गेलेल्या महिलेने माझा विनयभंग केला असा आरोप या डॉक्टरांवर केला. त्यांनी फिर्यादी डॉक्टर आणि त्यांच्या सहकार्याना धमकावत आम्ही पोलीस आहोत, असे म्हणत स्विफ्ट कारमध्ये जबरदस्तीने बसविले. त्यानंतर त्यांचे अपहरणकरून सासवडच्या दिशेने नेले. काहीवेळाने पुन्हा परत हडपसर येथे आणून एका कार्यालयात डांबले . तसेच यावेळी दोघांनी त्यांना आम्ही पत्रकार आहोत, तुम्ही हे प्रकरण तात्काळ मिटवा. अन्यथा तुमच्यावर केस होईल आणि तुमची व तुमच्या रुग्णालयाची बदनामी होईल अशी भीती दाखवली. त्यांना मारहाण केली. यानंतर त्यांच्याकडे 10 लाख रुपयांची खंडणी मागितली. लॉकडाऊन असल्याने डॉक्टरांना इतके पैसे जमले नाही. त्यांनी नातेवाईक मित्र अश्या सर्वांकडून 5 लाख 89 हजार रुपये जमा केले. तसेच ते आरोपींना दिले. त्यावेळी त्यांची सायंकाळी सुटका केली. या सर्व प्रकारामुळे डॉक्टर खूप घाबरून गेले होते. दोन दिवसांनी त्यांच्या ओळखीतील पोलीस मित्र यांना ही घटना सांगितली. त्यानंतर हा सर्व प्रकार गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना समजला. यानंतर गुन्हा दाखल आरोपीना पकडण्यात आले आहे.

प्राथमिक चौकशीत त्यांनी अश्या प्रकारे अनेक मोठ्या डॉक्टरांना धमकावत खंडणी उकळ्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रतिष्ठित खंडणी खोरांची मोठी टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे. अधिक तपास सुरू आहे.

गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोहिते, उपनिरीक्षक संजय गायकवाड, कर्मचारी अमोल पिलाने, मोहन येलपल्ले, विजय गुरव, उदय काळभोर, संदीप साबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like