Pune News : पुण्याच्या औंध येथील 6 पर्यटक बुडाले, तिघांचा मृत्यू; रत्नागिरी जिल्हयातील आंजर्ले समुद्र किनार्‍यावरील घटना

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन –   पर्यटनासाठी (Tourist) गेलेले पुण्यातील (Pune) काही पर्यटक रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील दापोली (Dapoli) तालुक्यातील आंजर्ले समुद्रात बुडाल्याची घटना आज (शुक्रवार) घडली आहे. आंजर्ले समुद्रात एकूण सहा पर्यटक बुडाले असून त्यापैकी तीन पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर तिघांना स्थानिकांच्या मदतीने वाचवण्यात यश आले आहे. या घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पुण्यातील औंध परिसरातील निहाल चव्हाण, अक्षय राखेलकर, उबेस खान, रोहित पलांडे, विकास श्रीवास्तव, मनोज गावंडे यांच्यासह 14 पर्यटक फिरण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात गेले होते. हे सर्व पर्यटक आज दुपारी आंजर्ले समुद्र किनाऱ्यावर गेले होते. ते पोहण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने सहाजण पाण्यात बुडाले.

ही घटना किनाऱ्यावर असलेल्या स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी त्या दिशेन धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी तीन जाणांना वाचवले (Rescue). बुडालेल्या एकूण सहा पर्यटकांपैकी तीन जणांचा यावेळी पाण्यात बुडून मृत्यू झाला. वाचवण्यात आलेल्या तीन तरुणांना सध्या दापोली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सहा तरुण पाण्यात बुडत असताना पाहिल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना तिघांना वाचवण्यात यश आलं. तिघांना वाचवत असताना तिनजण बेपत्ता झाले. त्यांचा शोध स्थानिकांनी घेतला. दरम्यान, या घटनेची माहिती दापोली पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बेपत्ता झालेल्या पर्यटकांचा शोध घेतला गेला. घटनेच्या काही वेळाने बेपत्ता झालेल्या तिघांचे मृतदेह सापडले. दापोली पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून, वाचवण्यात आलेल्या तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.