ओळखलं का ? गाण्यानंतर आता ‘रॅम्प’ वॉक आणि ‘मेकअप’मुळं रानू मंडल पुन्हा ‘चर्चे’त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सोशल मीडियामुळे स्टार बनलेल्या रानू मंडल यांचा रॅम्पवॉक व्हिडीओ आणि मेकअप केलेला फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. मात्र रानू मंडल यांचा हा लूक नेटकऱ्यांच्या पसंतीला उतरलेला दिसत नाही.

रानू मंडल यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ एका कार्यक्रमतील असून त्या डिझायनरसोबत रॅम्पवर वॉक करताना दिसत आहेत. रॅम्प वॉक करताना अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या चित्रपटातील ‘फॅशन का है ये जलवा’ हे गाणे सुरु आहे. रानू मंडल यांनी डिझायनर ड्रेस परिधान केला असून त्या ड्रेसवर हेवी मेकअप केला आहे. मात्र त्यांचा हा मेकअप लुक नेटकऱ्यांना फारसा आवडलेला दिसत नाही. त्यांच्या या लुकवरून सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवली जात आहे.

एका युजरने रानू मंडल यांचा फोटो शेयर करत म्हंटले आहे की , ‘मुलींनो चेहऱ्यासाठी मुलतानी माती वापरा. ‘

तर दुसऱ्या युजरने म्हंटले आहे की , मेकअप कॉन्टेस्ट मध्ये रानू मंडल यांना पहिले बक्षीस मिळाले आहे.

Visit : Policenama.com 

 

 

Loading...
You might also like