दीपिकाने शेअर केले ‘बेडरूम सिक्रेट’ ; ऐकून रणवीरही झाला अवाक  

मुंबई : वृत्तसंस्था – गेल्या वर्षी लग्न झालेलं बॉलिवूडचं लव्हेबल कपल रणवीर-दीपिका अनेक कार्यक्रमात एकत्र दिसतात. अनेक वेळा रणवीर दीपिकाची काळजी घेतानाही दिसतो. अशाच या कपलने नुकत्याच झालेल्या एका पुरस्कार समारंभात स्टायलिश लूकमध्ये उपस्थिती लावली. या पुरस्कार सोहळ्यात दीपिकाला वुमन ऑफ द इयर हा पुरस्कारही मिळाला.

यावेळी तिने लग्न आणि नवऱ्यासोबतच्या नात्याबद्दल गप्पा मारल्या. दीपिका या सगळ्यात एका प्रश्नाचं उत्तर देताना असे काही म्हणाली की ते ऐकून रणवीर सिंह देखील थक्क झाला होता.

रणवीरच्या स्टाइल आणि ब्युटी सिक्रेटबद्दल दीपिकाला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा दीपिका म्हणाली की, रणवीर आंघोळ आणि टॉयलेटला सर्वात जास्त वेळ लावतो. तसेच दीपिका पुढे म्हणाली की, बेडमध्येही तो सर्वाधिक काळ असतो. दीपिकाच्या या बोलण्यावर सगळे उपस्थित लोक हसू लागले. दीपिकाचे हे बोलणे ऐकून रणवीर तिच्याजवळ धावून गेला आणि तिला मध्येच थांबवले.

दीपिकाला यावेळी कळले की बोलताना तिने नीट वाक्य वापरले नाही तेव्हा आपले वाक्य सुधारत नंतर म्हणाली की, मला असे म्हणायचे आहे की, तो फोनवर एवढा बिझी असतो की लवकर झोपत नाही. नंतर दीपिकाने रणवीरच्या स्टाइल बाबत खुलासा करत सांगितले, रणवीर जेव्हाही कुठे जाण्यासाठी कपड्यांची निवड करतो, तेव्हा तो माझ्या संमतीनेच कपडे घालतो.