अमेरिकेत मिळतोय दीपिका पादुकोण ‘डोसा’ 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सेलिब्रेटींच्या नावाने एखादे प्रॉडक्ट विकले जाते ही काही नवीन बाब नाही. नुकत्याच लग्न झालेल्या दीपिका पादुकोणचे चाहते देखील केवळ भारतातच नाही तर परदेशात देखील आहेत. मात्र साता समुद्रा पार अमेरिकेत अभिनेत्री दीपिका पादुकोण च्या फॅन कडून तिच्या नावाने चक्क डोसा विकला जातो आहे. अमेरिकेतल्या एका रेस्टोरंन्टच्या मेन्यू कार्डावर दीपिका पादुकोणचे नाव आहे. हे खुद्द दीपिकाने सोशल मीडियावर मेनु कार्ड शेअर करून सांगितले.

अमेरिकेतील एका रेस्टॉरंटमधील मेनुकार्डमधील स्पेशल डोसाचे नाव दीपिका पदुकोण असे ठेवण्यात आले आहे. हे मेनुकार्ड खुद्द दीपवीर या क्यूट जोडीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. रणवीरने मेनुकार्ड शेअर करतेवेळेस ‘तो मेन्यू मी खाल्ला’ अशी कॅप्शन दिली.

तर, पुण्यामध्ये एका रेस्टॉरंटमधील मेनुकार्डमध्ये ‘दीपिका पदुकोण पराठा थाली’ या नावाले पराठा विकला जात आहे. या मेनुकार्डचा फोटो एका युजरने दीपिकाला ट्विट केला आहे. ट्विट करतेवेळेस आहे की,  पुण्यात दीपिका तुम्ही पराठा थालीदेखील आहे. याला प्रत्युत्तर देत दीपिकाने स्माईली पाठवली आहे.

ही पराठा थाली किंमत ६०० रूपये इतकी आहे. या मेनूकार्डमध्ये केवळ दीपिकाच नव्हे तर सचिन तेंदुलकर, युवराज सिंग, यांच्या नावाचादेखील समावेश आहे.