Ranveer Singh and Deepika Padukone | रणवीर, दीपिका होणार अलिबागकर; ‘या’ कामासाठी मोजले तब्बल 22 कोटी रूपये

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – Ranveer Singh and Deepika Padukone | अलिबाग-मापगाव येथे अभिनेता रणवीर सिंग, त्याची पत्नी अभिनेत्री दीपिका पदुकोण (Ranveer Singh and Deepika Padukone) यांनी तब्बल दाेन एकर १० गुंठे जमीन खरेदी केली आहे. सुमारे २२ कोटींना हा व्यवहार झाला असून के. ए. एंटरप्रायजेस एलएलपीतर्फे नियुक्त भागीदार दीपिका पदुकाेण आणि आर. एस. वर्ल्डवाईड एंटरटेनमेंट प्रा.लि.तर्फे संचालक रणवीर सिंह भावनानी यांनी हा खरेदीव्यवहार केला आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे जी जमीन खरेदी केली आहे तेथे १७ हजार ४५० चाै. फुटांचे घरही आहे. त्यामुळे आता रणवीर आणि दीपिका अलिबागकर झाले आहेत.

उद्याेगपती, सिने कलाकार, जागतिक कीर्तीचे खेळाडू यांनाही अलिबागचा माेह आवरलेला नाही. अनेकांनी या ठिकाणी बंगले घेतले आहेत.
काही दिवसापूर्वी अलिबाग-वरसाेली येथे उद्याेगपती रतन टाटा यांनीही वास्तव्य केले आहे. काही चित्रपटांत कलाकारांच्या तोंडून नेहमीच ‘अलिबाग से आया है क्या’ असे संवाद एकात होतो आता हेच कलाकार अलिबागच्या प्रेमात पडले आहे.

सोमवारी दीपिका आणि रणवीर हे खरेदी-विक्री व्यवहारासाठी अलिबागच्या मुख्य दुय्यम निबंधक कार्यालयात आले हाेते. त्यावेळी त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली हाेती. यावेळी रणवीरने आपला चेहरा मास्क आणि अंगात परिधान केलेल्या हुडीने झाकला हाेता, तर दीपिकानेही मास्क परिधान केला हाेता.

हे देखील वाचा

Modi Government | सरकारी कर्मचार्‍यांना 2,18,200 रुपये देईल मोदी सरकार, ऑक्टोबरमध्ये अकाऊंटमध्ये येऊ शकतात पैसे, जाणून घ्या

Pune Crime | मैत्रीचा गैरफायदा घेऊन अल्पवयीन मुलीवर 20 वर्षाच्या युवकाकडून बलात्कार, हडपसर परिसरातील घटना

Supreme Court | अविवाहित किंवा विधवा मुलीलाच अनुकंपा खाली होणार्‍या नियुक्तीसाठी अवलंबित मानले जाईल – सुप्रीम कोर्ट

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Ranveer Singh and Deepika Padukone | ranveer deepika counted rs 22 crore become alibagkar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update