Video : अभिनेत्री करिश्मा कपूर आणि रणवीर सिंहची ‘या’ गाण्यावर धमाल

मुबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस करिश्मा कपूरने कालच आपला 45 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसादिवशीच करिश्मा कपूर आणि रणवीर सिंहचा एक व्हिडीओ समोर आला आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत रणवीर सिंह आणि करिश्मा कपूर ‘सरकाईलो खटिया’ या पॉप्युलर साँगवर डान्स करताना दिसत आहेत. दोघेही मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे.

https://www.instagram.com/p/BzICPlYBRGU/?utm_source=ig_embed

सरकाईलो खटिया हे गाणं 1994 साली आलेल्या गोविंदा, कादर खान आणि करिश्मा कपूर यांच्या राजा बाबू या सिनेमातील आहे. हे गाणं त्यावेळी खूप गाजलं होतं. सोशलवर या व्हिडीओला खूपच लोकप्रियता मिळताना दिसत आहे. यावेळी करिश्माने आपला वाढदिवस लंडनमध्ये साजरा केला आहे. तिने सोशलवर बहिण करिना आणि जीजू सैफ सोबतचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो लंडनमधील एका क्लबमध्ये पार्टी करताना क्लिक केलेले आहेत.

करिश्मा आणि रणवीरचा हा व्हिडीओ सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. यात रणवीर आणि करिश्मा सोफ्यावर बसून डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओत रणवीरने कॅप घातलेली दिसत आहे. करिश्मानेदेखील चष्मा घातला आहे त्यात ती खूपच क्युट दिसत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. करिश्मा आणि रणवीरचा व्हिडीओ चाहत्यांना विशेष आवडला आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट केली आहे. चाहते हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करताना दिसत आहेत.

आरोग्य विषयक वृत्त

पुण्यात ‘डॉक्टर्स डे’ निमित्त ३० जून रोजी सन्मान सोहळा

जाणून घ्या – मूत्रपिंड विकाराची लक्षणे

लहान मुलांचा ‘टिफिन’ देताना घ्या ही काळजी

जाणून घ्या ‘लिंबाचे’ औषधी गुणधर्म