चांगला पती होण्यासाठी करिनाने दिला रणवीरला ‘हा’ सल्ला 

मुंबई : वृत्तसंस्था – गेल्या वर्षी लग्न झालेलं बॉलिवूडचं लव्हेबल कपल रणवीर-दीपिका यांची सतत चर्चा होताना दिसत असते. रणवीर नेहमी दीपिकाची काळजी घेऊन मनं जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. नुकतेच रणवीरने करीनाच्या रेडिओ शो मध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये रणवीरने करिनाला चांगला पती होण्यासाठी काय करावं लागतं याबाबत सल्ला विचारला आहे.

‘माझं नुकतंच लग्न झालं आहे, त्यामुळे उत्तम पती व्हावं यासाठी मी काय करावं ते मला सांग,’ असं रणवीरने करिनाला विचारलं. त्यावर करिना म्हणाली, ‘दीपिकावर तू किती प्रेम करतोस हे संपूर्ण देशाला माहीत आहे. तुला खरंतर कोणत्याच सल्ल्याची, टीप्सची गरज नाही. दीपिकावर तू ज्याप्रमाणे प्रेमाचा वर्षाव करतोस, ते पाहून अनेकांनाच हेवा वाटतो. पण एक गोष्ट मी तुला नक्की सांगेन की नात्यातील एकमेकांचा स्वातंत्र्य टिकवण्याचा प्रयत्न करा. बाकी सर्व गोष्टी तुम्हाला मिळतीलच.’

करिनाने दिलेल्या या सल्ल्यावर रणवीरने करिनाचे आभार मानले .लवकरच रणवीर करण जोहरच्या आगामी ‘तख्त’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर,करिना, अनिल कपूर,आलीय भट्ट, विकी कौशल ,भूमी पेडणेकर आणि जान्हवी कपूर दिसणार आहे. तर करिना कपूर , अक्षकुमार सोबत ‘गुड न्यूज’ चित्रपटात दिसणार आहे.