जेव्हा 83 च्या सेटवर रडला रणवीर सिंह, दिग्दर्शक कबीर खानंन ‘तो’ किस्सा सांगितला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कबीर खान दिग्दर्शित 83 या सिनेमाची सगळीकडे चर्चा सध्या जोरात सुरु आहे. या सिनेमात कपिल देवची भूमिका करणाऱ्या रणवीर सिंहचा लूक सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणावेळी एकदा रणवीर सिंहला रडू आवरले नव्हते. कबीर सिंह याने याचा नुकताच खुलासा केला.

एका खासगी वृत्तसंस्थेला मुलाखत देताना कबीर सिंह याने याविषयीचा किस्सा सांगितला. एका सीनच्या शुटवेळी त्याने डोळ्यात पाणी आणून कट म्हटले होते. त्यावेळी त्याच्या डोळ्यात आनंद आणि दुःख दोन्ही अश्रू होते. लंडनमधील लॉर्ड्स मैदानात त्यांनी पाच दिवस या चित्रपटाचे चित्रीकरण केले होते. यावेळी त्यांनी मैदानातील ड्रेसिंग रूम आणि लोकर रूम दोन्हीचा वापर केला होता. भारताने वर्ल्डकप जिंकल्यानंतर ज्यावेळी कपिल देवने वर्ल्डकप हातात घेतला, त्या दृष्याचे चित्रीकरण करत असताना रणवीर सिंह याला रडू कोसळले.

पात्रांबरोबर रणवीरचा संबंध
कबीर याने याविषयी अधिक बोलताना म्हटले की, रणवीर प्रत्येक पात्र जगतो. कोणत्याही प्रकारची भूमिका तो सहज ओढून नेतो. यावेळी कपिल देव यांची मुलगी देखील सेटवर उपस्थित होती. ती या सिनेमाची सहाय्यक दिग्दर्शक आहे.

सिनेमातील दुसरी पात्रे
हा सिनेमा पुढील वर्षी प्रदर्शित होणार असून यामध्ये रणवीर सिंहबरोबरच दीपिका पादुकोण, पंकज त्रिपाठी, बोमन ईरानी, साकिब सलीम, हार्डी संधू, एमी वि‍र्क यांच्यासह अनेक कलाकार आहेत.

Visit : Policenama.com

Loading...
You might also like