3 वर्षे कामासाठी दारोदार भटकला होता रणवीर सिंग ! ‘असा’ मिळाला पहिला मोठा ‘ब्रेक’

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचा एनर्जेटीक अ‍ॅक्टर रवणीर सिंग (Ranveer Singh) आपल्या अभिनयाव्यतिरीक्त नेहमीच आपल्या स्टाईल आणि अनोख्या फॅशनमुळे चर्चेत असतो. अनेकदा तो चित्र विचित्र कपड्यांमध्ये दिसत असतो. आज रणवीर बॉलिवूडमधील टॉपच्या कलाकारांमधील एक आहे. आज तो लक्झरी लाईफ जगत आहे. परंतु एक काळ असा होता जेव्हा त्याला ब्रेक मिळत नव्हता. दारोदार त्याला भटकावं लागलं होतं. एका मुलाखतीत रणवीरनं त्याच्या स्ट्रगलबद्दल उल्लेख केला आहे. त्यानं सांगितलं की, तब्बल तीन वर्षे त्याला कामासाठी भटकावं लागलं होतं. त्याचा पहिला मोठा ब्रेक कसा मिळाला याबाबतही त्यानं माहिती दिली आहे.

रणवीर सिंग म्हणाला, साडे तीन वर्षे मी अंधेरीतच होतो. प्रयत्न करत होता की, कुठे ब्रेक मिळावा. पोर्टफोलियो घेऊन खूप ऑफिसेस फिरलो. मी मोठा अ‍ॅक्टर बनेन, लिड रोल प्ले करेन हा विचार करणंही त्यावेळी माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. आईवडिलांच्या आशीर्वादानं मी पुढं जात राहिलो.

पुढं बोलताना रणवीर म्हणतो, बँड बाजा बाराती (डेब्यू सिनेमा) हा सिनेमा आधी रणबीर कपूरला ऑफर झाला होता. परंतु त्यानं या सिनेमासाठी नकार दिला होता. यशराजला एका नवीन चेहऱ्याची गरज होती. मला यासाठी फोन आला आणि मी ही संधी सोडली नाही. मी कोणती मॉडेलिंग किंवा म्युझिक व्हिडीओ केला नव्हता. माझा चेहरा कायमच लपवून ठेवला होता. परंतु नंतर मला हा मोठा ब्रेक मिळाला असंही त्यानं सांगितलं.

रणवीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो 83 या आगामी सिनेमामध्ये दिसणार आहे. सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर 1983 सालच्या क्रिकेट वर्ल्डकपमधील भारताच्या विजयाची कहाणी या सिनेमात दाखवली जाणार आहे. सिनेमात रणवीरनं लिजेंडरी क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा 10 एप्रिल 2020 रोजी रिलीज होणार होता परंतु लॉकडाऊनमुळं सिनेमाची रिलीज टाळण्यात आली.