’12 व्या वर्षीच वयाने मोठ्या महिलेशी ठेवले होते शरीरसंबंध’, रणवीर सिंगचा मोठा ‘गौप्यस्फोट’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता रणवीर सिंगने सेक्स लाईफला घेऊन मोठा खुलासा केला आहे. अवघ्या १२ व्या वर्षी पहिल्यांदा सेक्स केला आहे अशी कबुली रणवीरने दिली आहे. एका मुलाखतीत तो बोलत होता. कंडोमबद्दल विचारलेल्या प्रश्नावर त्याने हा खुलासा केला आहे. वयाच्या १२ व्या वर्षी वयाने मोठ्या असलेल्या महिलेसोबत उत्सुकतेपोटी सेक्स केल्याचं रणवीरने म्हटलं आहे.

View this post on Instagram

Me looking at you eating carbs like

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

मुलाखतीत बोलताना तो म्हणाला की, “मी प्रत्येक गोष्ट खूप लहान असताना केली आहे असे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. माझ्या मित्रांचे आईवडिलही मी शाळेत असताना म्हणत असत की, तू आमच्या मुलांना बिघडवत आहेस. माझ्या वयाच्या मुलांना सेक्सविषयी जास्त माहीत नव्हतं. म्हणून मी यात खूप एक्सपर्ट झालो असे मला वाटायला लागलं होतं.”

कंडोमची जाहिरात करण्यामागील कारण सांगताना तो म्हणाला की, “मी एकदा कारमध्ये बसलो होतो. समोर असलेल्या होर्डिंगवरील जाहिराती मी पहात होतो. त्यात विविध जाहिराती होत्या परंतु त्यात कंडोमची जाहिरात कुठेच नव्हती. मला समजलं की, कंडोमच्या जाहिराती प्रक्षोभक आहेत. समाजाचा या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन आता बदलत आहे. त्यामुळे याविषयी आपण मोकळेपणाने बोलू शकतो.”

आरोग्यविषयक वृत्त

 

 

You might also like