Live मुलाखतीत आईचं बोलणं ऐकून ‘ढसा-ढसा’ रडला रणवीर सिंग ! इमोशनल व्हिडीओ ‘व्हायरल’

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार रणवीर सिंगचा एक थ्रोबॅक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात रणवीर चालू मुलाखतीत रडताना दिसत आहे. रणवीरनं नवीनच त्याची ओळख तयार केली होती. त्याला सर्वांना सपोर्ट होता. मुलखतीत रणवीरला सरप्राईज देणारा एक व्हिडीओ दाखवण्यात आला. यात त्याची आई असं काही बोलली ज्यानंतर रणवीरला रडू कोसळलं. सिमी ग्रेवालच्या टॉकशोमधील मुलाखतीचा हा व्हिडीओ आहे.

रणवीरची आई म्हणते की, “एक वेळ अशी होती जेव्हा रणवीर घरी यायचा तेव्हा म्हणायचा की, आजचा दिवस खूप खराब होता. मला त्याच्या चेहऱ्यावरून सारं काही कळत होतं. आम्ही दु:खी होऊ नये यासाठी तो आम्हाला जास्त काही सांगत नसे. जेव्हा तो सक्सेसफुल झाला आहे तर आता कुठे आम्हाला त्या दिवसांतील काही गोष्ट सांगत आहे. काय काय झेलावं लागलं. कशा कशा कमेंट ऐकाव्या लागल्या. आम्हाला त्यानं त्याच्या साऱ्या त्रासापासून दूर ठेवलं. त्याची स्टोरी ऐकल्यानंतर कळतं की, या उंचीवर येण्यासाठी त्याला किती स्ट्रगल करावा लागला आहे.

या व्हिडीओनंतर आईचं बोलणं ऐकल्यानंतर रणवीरला अचानकच रडू कोसळतं. हे पाहून टॉक शोमधील सिमी ग्रेवाल वारंवार त्याला सॉरी बोलते.