Brahmastra Motion Poster | अखेर ‘ब्रम्हास्त्र’चं मोशन पोस्टर झालं प्रदर्शित, रणबीर दिसणार शिवाच्या भूमिकेत

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Brahmastra Motion Poster | बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) यांच्या बहुचर्चित ‘ब्रम्हास्त्र’ची चाहते आतुरतेने वाट बघत होते. ब्रम्हास्त्र चित्रपट आयान मुखर्जीनं दिग्दर्शित केला असून, आजच चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या समोर आली आहे. (Brahmastra Motion Poster)

‘ब्रह्मास्त्र’ (Bramhastra) या चित्रपटाचे प्रदर्शनाची तारीख देखील आज जाहीर करण्यात आली असून, 9 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. चहाते या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आतुर झाले आहेत. नुकतंच सोशल मीडियावर ब्रह्मास्त्रचं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलंय. या पोस्टरमध्ये रणबीर कपूरचा पात्र एकदम हटके दिसत आहे. तसेच पोस्टरमध्ये रणबीर स्वतःला ‘शिवा’ असं म्हणत असून, त्याला जगातील भविष्य दिसत आहे. या पोस्टरमध्ये आलियाच्या पात्राचा देखील आवाज येतो. ती (Alia Bhatt) म्हणते, ‘हे सगळं त्याच्या सोबतच कसं काय होतं.’ पोस्टरवरून रणबीर शिवा या नावाचं पात्र साकारणार असल्याचं समोर आलंय. (Brahmastra Motion Poster)

दरम्यान, या चित्रपटामध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिका साकारणार असून, प्रेक्षक त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहाण्यासाठी आतुर झाले आहे. तसेच त्यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन(Amitabh Bacchan) देखील आहे. तसेच मौनी रॉय (Mouni Roy), नागार्जुन (Nagarjuna) आणि डिंपल कपाडिया (Dimple Kapadiya) हे देखील या चित्रपटात दिसणार असून, दिग्दर्शक आयान खाननं या चित्रपटासाठी खूप विचार करून पात्र निवडल आहे. प्रेक्षकांच्या अंदाजानुसार हा चित्रपट सुपर-डुपर हिट होणार आहे असं म्हटलं जातं.

Web Title :- Ranveer Singh Deepika Padukone | brahmastra motion poster ranbir kapoor alia bhatt amitabh bachchans much awaited films first glimpse is out now

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ranveer Singh-Deepika Padukone | रणवीरनं विमानतळावरच केलं दीपिकाला KISS, व्हिडिओ झाला व्हायरल

Twinkle Khanna | ट्विंकल खन्नाची पोस्ट चर्चेत ! ती म्हणाली – ‘मी अपराधीपणाने जगत आहे’

Pune Corporation | पाणी बिलाचे 78 कोटी रुपये थकविल्याने पुणे मनपानं ‘पुणे कॅन्टोंन्मेंट बोर्डा’चा पाणी पुरवठा ठेवला दिवसभर बंद; उद्याही…

Nia Sharma | ‘सात समंदर पार’ या गाण्यावर निया शर्मानं केला बोल्ड डान्स, व्हिडिओनं सोशल मीडियावर लावली ‘आग’

HM Amit Shah Pune Visit | गृहमंत्री अमित शाह रविवारी पुणे महापालिकेत ! महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती