गली बॉय रणवीरची ‘ती’ उडी चाहत्यांना महागात पडली

मुंबई : वृत्तसंस्था – एका कार्यक्रमात परफॉर्म करताना अभिनेता रणवीर सिंगने अतिउत्साही पणा दाखवून अचानकपणे चाहत्यांच्या अंगावर उडी मारली. या कार्यक्रमात स्टेजवर रॅप साँग गात असताना त्याने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक स्टेजवरून चाहत्यांच्या गर्दीत उडी मारल्याने काही चाहते जखमी झाले आहेत.
‘गली बॉय’ या त्याच्या आगामी चित्रपटातील रॅप साँग गात असताना रणवीर अचानक त्याचा गॉगल आणि हॅट काढून स्टेजवरून चाहत्यांच्या गर्दीत उडी मारताना चा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. उडी मारताना रणवीरचा टाईमिंग चुकला आणि रणवीरचे मोबाईलने शुटींग घेत असलेल्या तरुणी यात जखमी झाल्या. या घटनेचे काही फोटोही व्हायरल होत आहेत. यात रणवीरच्या अचानक उडी घेतल्याने काही मुली घाबरून खाली बसलेल्या दिसत आहेत.
या घटनेनंतर सोशल मीडियावर रणवीरवर टीका होऊ लागली आहे. ‘हा बालिशपणा कमी कर अशी कमेंट काही युजर्सनी केली आहे. तर लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी रणवीर काहीही करू शकतो अशीही टीका काहींनी केली.
रणवीरचा ‘गली बॉय’ चित्रपट १४ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. या चित्रपटात रणवीर आणि आलीय दोघे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात रणवीर रॅपर च्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे. हा चित्रपट जोया अख्तरने डायरेक्ट केला आहे.
https://www.instagram.com/p/BtdiP1KFnjc/