लग्नापूर्वी दीपिकाला ‘इम्प्रेस’ करण्यासाठी रणवीर उडवायचा पैसे, वडिलांनी टोकल्यानंतर अभिनेता म्हणाला…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार रणवीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांची लव स्टोरी सर्वांनाच माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच रणवीर सिंगनं फुटबॉलपटू सुनील छेत्रीला मुलाखत दिली होती. यावेळी त्यानं अनेक किस्से शेअर केले होते. यातीलच फुलांच्या संदर्भातील एक किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

सुनील छेत्रीनं रणवीरला लाईव चॅटमध्ये विचारलं की, लग्नाआधी दीपिका पादुकोणसाठी काय केलंस. यावेळी रणवीरनं खूप मजेदार किस्सा सांगितला. रणवीर म्हणाला, “मी दीपिकाला भेटल्यानंतर 6 महिन्यातच ठरवलं होतं की, हिच्यासोबत लग्न करायचं आहे. परंतु तिला इम्प्रेस करणं एवढं सोपं नव्हतं.”

https://www.instagram.com/p/BuLtsAEAaXF/?utm_source=ig_embed

रणवीरनं सांगितलं की, “जेव्हा कधी मी तिला भेटायला जायचो तेव्हा मी तिच्यासाठी फुलं घेऊन जात असे. काही वेळा तर आम्ही फक्त एकच तास किंवा काही मिनिटंच भेटायचो. छोट्या भेटीसाठीही मी तिच्यासाठी लिलीची फुलं घेऊन जात असे. मला माहित होतं की, दीपिकाला लिली खूप आवडते.”

रणवीर पुढे म्हणाला, “मी जो पैसा फुलांवर उधळत होतो. त्याबद्दल माझ्या बाबांना माहित होतं. त्यांनी मला विचारलं होतं की, तुला कल्पना आहे का तू या फुलांवर किती पैसे खर्च करतोस. यावर मी त्यांना म्हणालो, बाबा तुम्ही काळजी करू नका. लक्ष्मीच्या रुपात तुम्हाला ते पैसे परत मिळणार आहेत.

रणवीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो 83 या आगामी सिनेमामध्ये दिसणार आहे. सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर 1983 सालच्या क्रिकेट वर्ल्डकपमधील भारताच्या विजयाची कहाणी या सिनेमात दाखवली जाणार आहे. सिनेमात रणवीरनं लिजेंडरी क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा 10 एप्रिल 2020 रोजी रिलीज होणार होता परंतु लॉकडाऊनमुळं सिनेमाची रिलीज टाळण्यात आली.