‘रणवीर’ची लग्नात सरप्राईझ एंट्री !

मुंबई  : वृत्तसंस्था  – एखाद्या कार्यक्रमात आपल्या चाहत्या कलाकारांची ‘झलक’ मिळवण्यासाठी अनेक जण  गर्दी करत असतात. पण याच कलाकारांकडून कधी कधी चाहत्यांना ‘सरप्राईज’ मिळते. असच काहीस ‘सरप्राईझ’ रणवीर सिंग याच्याकडून मिळाले  आहे त्याच्या चाहत्यांना रणवीर सिंग चा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे .
रणवीर सिंग  सिम्बाच्या  प्रमोशनसाठी मुंबईच्या एका हॉटेलमध्ये थांबला होता. याच हॉटेलच्या पूल एरियात एक लग्न होत होते.  रणवीर पूल एरियाच्या दिशेने येतोय, म्हटल्यावर लग्नातील एका पाहुण्याने त्याला बोलवले. येथे सिंधी लग्न सुरू आहे,रणवीर प्लीज ये…असे हा पाहुणा म्हणाला. मग काय, मागचा पुढचा कुठलाही विचार न करता रणवीर लग्नात पोहोचला ही  सरप्राईज एन्ट्री मारत त्याने सगळ्यांनाआश्चर्यचकित केले.
साक्षात  रणवीर सिंगला पाहून नवरा-नवरीसह सगळेच उत्साहित झाले. तसेच रणवीरने पाहुण्यांसोबत सेल्फी काढला आणि नवरा -नवरीला ही लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. रणवीरचा ‘सिम्बा’ येत्या २८ डिसेंबरला प्रदर्शित होतोय. या चित्रपटातून रणवीर सिंग व सारा अली खान या दोघांची जोडी पहिल्यांदा एकत्र दिसणार आहे . १४-१५ नोव्हेंबरला रणवीर सिंग आणि दीपिकाने इटलीतील लेक कोमो मध्ये लग्न केले होते.
व्हिडीओ लिंक  –